Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "जेव्हा तुला वाचता येईल तेव्हा..." बिग बॉसच्या घरात पॅडी दादानी घेतली सूरजची शाळा, Video व्हायरल

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातील समीकरण बदलताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता नवीन वळण आलं आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. महाराष्ट्रातील घराघरांत बिग बॉस प्रेमी पाहायला मिळतात. येत्या काही दिवसांतच बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच बिग बॉसच्या घरातील समीकरण बदलताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता नवीन वळण आलं आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या 'UNSEEN UNDEKHA' मध्ये तुम्ही पाहू शकता, पॅडी भाऊ आणि सूरज गार्डन एरियात बसले असताना,पॅडी भाऊंनी सूरजची शिकवणी घेत आहेत असे व्हिडीओत दिसत आहे.

पॅडी भाऊ म्हणाले,"जेव्हा तुला वाचायला येईल तेव्हा जे हातात मिळेल मग तो पेपर असो या पुस्तक सगळे वाच. जे तू वाचतोय त्याच्या अर्थ समजून घ्यायचा आणि मग वाचायचे. शब्द समजून घ्यायचा प्रयत्न कर."

सूरज पॅडी भाऊंचा मदतीने गार्डन एरियात जिथे सदस्याच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत. ते वाचायचा प्रयत्न करत आहे. पॅडी भाऊ त्याला शब्द, उच्चार, काना, अनुस्वार यांची ओळख करून देत वाचायला शिकवत आहेत. भाऊंनी त्याला वर्षा ऊसगांवकर हे नाव उच्चारायला शिकवले आहे.

बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनालेची अधिकृतपणे घोषणी देण्यात आली आहे. यानंतर आता सर्वत्र कोण जिंकणार, कोणाच्या हातात बिग बॉस मराठीची ट्रॉफी जाणार याची चर्चा रंगली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आता सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, वर्षा उसगावकर, पाडूरंग कांबळे, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर या स्पर्धकांची खेळी दिसत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :चंद्रकांत पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT