Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : आधी राडा मग मिठी; निक्की-अरबाज पुन्हा एकत्र, नव्या गेम प्लॅनला सुरुवात

Nikki-Arbaaz : निक्की आणि अरबाज यांच्यातील भांडण मिटण्याची शक्यता. आता बिग बॉसच्या घरात नवीन गेम प्लान सुरु होणार आहे.

Shreya Maskar

बिग बॉस (Bigg Boss Marathi) मराठीचा यंदाचा सीझ भलताच गाजत आहे. प्रत्येक दिवशी बिग बॉसच्या घरात नवीन राडा होत आहे. दोन्ही तुफान स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यातच टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडली आहे.

सध्या बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजची मैत्रीला प्रेक्षक खूप मिस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून निक्की आणि अरबाजमध्ये दुरावा आल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले आणि त्यांनी बोलणे बंद केले. पण आता निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाज एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. अरबाजने निक्कीला घट्ट मिठी मारल्याचे पाहायला मिळत आहे. अरबाज निक्कीचं नक्की चाललंय तरी काय? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. हा त्यांचा नवा गेम प्लॅन तर नाही ना असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

निक्की-अरबाज पुन्हा एकत्र

'बिग बॉस मराठी'चा नुकताच नवीन प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो खूप खास आहे. या प्रोमोमध्ये अरबाजने काचेवर "I Miss You" असे लिहून त्यापुढे सुंदर हार्टदेखील काढताना दिसत आहे. निक्कीची अरबाजला खूप आठवण येत असल्याच पाहायला मिळत आहे. त्या दोघांमधील दुरावा अरबाजला सहन होत नसल्याच प्रोमोमधून स्पष्ट होत आहे. या आधीही अरबाज निक्कीचा गैरसमज मिटवताना पाहायला मिळला होतो.

निक्की-अरबाज नवा गेम प्लॅन?

आता निक्की आणि अरबाज यांच नात कोणत वळण घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. हे दोघ एकत्र येऊन कसा खेळ खेळणार आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच त्यांच्या एकत्र येण्यामुळे घरातील इतर सदस्यांवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात किल्ला पहाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू

Accident News : समृद्धीवर भयंकर अपघात, ठाण्याहून नागपूरला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा जागीच मृत्यू

Pune News: पुणेकरांच्या खिशाला कात्री! मिळकतकरात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता | VIDEO

SCROLL FOR NEXT