Bigg Boss Marathi Grand Finale canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवच्या धमाकेदार डान्सचा जलवा

Irina and Vaibhav Dance Perfomance Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये घरातील सदस्यांचा धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे. ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना आणि वैभव यांचा जबरदस्त जलवा पाहायला मिळणार आहे.

Saam Tv

बिग बॉस मराठी सिझन ५च्या फिनालेला अवघे काही तास उरले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रॅंड फिनालेच्या मंचावर इरिना आणि वैभव धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे.

ग्रँड फिनालेमध्ये परदेसी गर्ल इरिना रुडाकोवा आणि बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाणचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे. वैभव आणि ईरिनाचा अत्यंत सुंदर आणि रोमँटिक स्टेप्सने हा परफॉर्मन्स खुलून आलेला दिसत आहे. बिग बॉसच्या घरात असताना दोघांची मैत्री, केमेस्ट्री डान्समध्ये देखील दिसून येत्ये. डान्सची झलक इतकी सुंदर तर पूर्ण परफॉर्मन्स किती छान असेल याबाबत उत्सुकता आता प्रेक्षरकांच्या मनामध्ये लागली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात यांदाचा सिझन ब्लॉकबस्टर ठरला आहे आता या सिझनच्या ट्रॉफीवर कोणत्या सदस्याचे नाव कोरले जाणार आहे या बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला 6 ऑक्टोबरसायंकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना हा शो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर आणि ‘जिओ सिनेमा’वर विनामूल्य पाहता येईल.

प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे कोणता सदस्य बिग बॉसच्या ५व्या सिझनचा विजेता ठरणार. सध्या निक्की, अभिजीत, धनंजय, अंकिता, सिरज आणि जान्हवी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या ५व्या पर्वाचे टॉप ५ ठरले आहेत. या सदस्यांमधील कोण तरी एक बिग बॉसच्या ट्रॉफीचे दावेदार ठरणार आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

SCROLL FOR NEXT