Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Grand Finale Aarya Jadhao: ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र यामध्ये आर्या जाधव ही दिसत नाही आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'च्या सीझन 5 चा ग्रँड फिनाले धमाकेदार सुरू आहे. या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र यामध्ये आर्या जाधव ही दिसत नाही आहे.

निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले. ग्रँड फिनाालेपूर्वी बिग बॉसच्या घरात रियुनियन टास्क पार पडला. यामध्ये बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक उपस्थित झाले होते यामध्ये आर्या जाधव दिसली नव्हती यामुळेच बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला आर्या दिसणार का असा प्रश्न प्रेक्षकांना होता. मात्र बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला आर्या आली नसल्याचे स्षष्ट होत आहे.

बिग बॉसच्या घरात आर्या आणि निक्की यांच्यामध्ये वाद झाला होता आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली होती. यामुळे तिला घराबाहेर पडावे लागले होते. कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखने आर्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आर्याचे कोणतेही एलिमिनेशन न होता तिच्या चुकीच्या वर्तनामुळे तिला घराबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आला होता. कारण बिग बॉसच्या मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधव दिसत नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT