Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: इतिहासात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार! 'बिग बॉस मराठी' च्या घरात शेवटच्या टप्प्यात नेमकं काय घडणार?

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरात आज 'आपला माणूस' शिव ठाकरे स्पेशल गेस्ट म्हणून जाणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा सध्या शेवटचा आठवडा सुरू असून आज घरात 'आपला माणूस' शिव ठाकरे स्पेशल गेस्ट म्हणून जाणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमधील अभिजीत सावंतचा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता, सगळ्यांत मिळून मिसळून वागणारा, कधी गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारा अभिजीत सावंत". 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वातील ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होणारं कौतुक ऐकून अभिजीतचेही डोळे पाणावले. प्रोमोमध्ये अभिजीत म्हणतोय,"या शोने खूप काही दिलंय".

'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूपच वेगळा असेल. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार आहे जे प्रेक्षकांना आजच्या विशेष भागात पाहायला मिळेल. बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार हे आठही सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांमध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT