Ankita Walawalkar Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar Post: अंकिताचं ठरलंय! ट्रॉफी आणि जावई घेऊनच घरी येणार... वडिलांना केलं प्रॉमिस

Ankita Walawalkar Emotional Post: बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेली सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने वडिलांना भावूक पोस्ट केली आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेली सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने वडिलांना भावूक पोस्ट केली आहे. अंकिता सध्या बिग बॉसच्या घरात आहे. यामुळे तिला घरच्या गणपती बाप्पाची आठवण येत आहे. नुकतंच सोशल मीडियावर अंकिताने खास पोस्ट शेअर केली आहे.

अंकिताने तिच्या पोस्टमध्ये, बाबा मी येताना ट्रॉफी आणि जावई घेऊनच येणार असल्याचं म्हटलं आहे. यंदा बिग बॉसच्या घरात असल्याने अंकिताला घरी गणेशोत्सव साजरा करता आला नाही. याचनिमित्ताने अंकिताने तिच्या बाबांचा पोस्ट शेअर करत मला तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असं म्हटलं आहे.

अंकिताने, बाबा आतापर्यंत आपल्यात बरेच आंबट गोड खटके उडलेत. कधी तुम्ही चिडलात तर कधी मी रुसले.पण खरं सांगू बाबा कितीही मतभेद असले तरी तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत आणि तुमचं प्रेम आम्हाला नेहमी दिसलं. आज ही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे.

अंकिताने, "लहानपणी मी ठरवलं होतं की मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. लहानपणी फटाक्यांसाठी हट्ट करायचो पण तुम्ही महाग म्हणून द्यायचा नाहीत आणि आता नेहमी फटाके घेऊन समुद्रावर येता आणि आम्ही वाजवत देखील नाही.तुमच्या हातातली ती फटाक्यांची पिशवी कायम भरलेलीच असते.

नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार, विसर्जन च्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फुट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हत.पण big boss च्या घरी असताना देखील खूप आधी मी हया सगळ्याची व्यवस्था करून आलेय, तुम्हाला काळजी करावी लागणार नाही,७ व्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील. काळजी करू नका गेल्यावर्षी बाप्पासोबत रात्री गप्पा मारल्या होत्या मी जेव्हा सगळे झोपले होते,आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी" असं अंकिताने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election 2024: राज्यातील बडे नेते झाले काठावर पास; कोण विजयी अन् कोण पराभूत

Maharashtra News Live Updates: महायुतीत महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्नला नकार?

IPL Mega Auction: IPL लिलावात अन्कॅप्ड खेळाडूंचा बोलबाला! या स्टार खेळाडूंवर लागली कोटींची बोली

Uddhav Thackeray : ते फडणवीस असले तरी आपण २० आहोत, पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा वज्रमूठ आवळली!

Gold Facts: जगातील 'या' देशांकडे सर्वात जास्त सोनं

SCROLL FOR NEXT