Bigg Boss Marathi Canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: निक्कीला खूप मस्त कानाखाली मारलीस; निक्कीच्या कानशिलात लावल्याने जय दुधाणे आर्यावर खूश

Arya Jadhav Viral Video: निक्कीला कानाखाली लगावल्यामुळे घराबाहेर जाणाऱ्या आर्याचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत जय दुधाणे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या ७व्या आठवड्यात घरातील सदस्यांमध्ये जबरदस्त राडे पाहायला मिळाले. बिग बॉसने दिलेल्या टास्कदरम्यान आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं. निक्कीवर राग आल्यामुळे माझ्याकडून हे कृत्य घडलं आणि बिग बॉसच्या घरातील नियमांचं उल्लंघन झालं, अशी कबुली आर्याने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर दिली होती. आर्याच्या या चुकीमुळे आर्याला घरातील ७व्या आठवड्यात भाऊच्या धक्क्याच्या भागात बिग बॉसचं घर सोडून जाण्यास सांगितले.

आर्या बिग बॉसच्या घरातून सातव्या आठवड्यात एलिमिनेट झाली. बिग बॉसना आर्या जाधवचं वागणं खटकलं अशी काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. आर्याच्या चाहत्यांचा तिला पूर्ण पठिंबा होता. निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळे नेटकऱ्यांनी आर्याचं कौतुक केलं. अशा परिस्थितीमध्ये बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाकडून आर्याचे कौतुक करण्यात आले आहे.

आर्या जाधव आणि बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक जय दुधाणे यांची भेट झाली होती. त्या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आर्या आणि जय बिग बॉसच्या घरातील चर्चा करत आहेत. व्हिडिओमध्ये जय बिग बॉसची नक्कल करतोय आणि म्हणतोय की," बिग बॉस म्हणत आहेत की, आर्या तुम्ही निक्कीला खुप मस्त कानाखाली मारलीत." त्या वाक्यावर आर्या त्याला म्हणते की, "ए तू कॉन्ट्रोव्हर्शिअल बोल."

त्यावर पुढे जय बोलतो की, "त्यात काय झालं.. आता शो खतम.. रात गयी बात गयी..बरं झालं तू ते केलस.. आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून तुला फूल सपोर्ट आहे." त्यावर आर्या बोलते की, "मी आता महाराष्ट्राची वाघीण झाली आहे." या व्हिडिओमध्ये आर्या आणि जयची मस्ती पाहायला मिळतेय. बिग बॉस मराठीचा ५वा सिझन १०० दिवसांचा नसून फक्त ७० दिवसांचा आहे. याबाबत बिग बॉसने कालच्या भागामध्ये जाहीर केले होते. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य यंदाच्या आठवड्यामध्ये नॉमिनेट झाले आहेत.

Edit By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

SCROLL FOR NEXT