BIGG BOSS MARATHI FAME DIVYA SHINDE BOOKED IN PUNE DOCTOR ASSAULT CASE saam tv
मनोरंजन बातम्या

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

Bigg Boss Marathi fame Divya Shinde FIR in Pune: पुण्यात ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेसह काही जणांविरोधात निवृत्त सरकारी डॉक्टरांना घरात घुसून मारहाण आणि 5 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

पुणे पोलिसांनी ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेसह काही जणांविरोधात निवृत्त सरकारी डॉक्टरांना यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या आरोपखाली आणि 5 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून शुक्रवारी पोलीस ठाण्यात 65 वर्षीय डॉ. विद्याधर गायकवाड यांनी तक्रार दाखल केली. डॉ. गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. ते करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. या संस्थेच्या वतीने 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व सभागृहात ‘कला आविष्कार महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. गायकवाड यांचे बंधू महेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या शिंदेला या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र, ती कार्यक्रमाला आली आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तिने उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर कार्यक्रमाला तिच्यामुळे प्रसिद्धी मिळाल्याचा दावा करत तिने 5 लाख रुपयांची मागणी केली. डॉ. विद्याधर यांनी GPayद्वारे सुमारे 50 हजार रुपये दिले होते, मात्र त्यानंतरही अधिक पैशांची मागणी तिच्याकडून सुरू होती.

FIRनुसार, दिव्या शिंदे, अण्णा धामधरे आणि इतर काही जण 17 सप्टेंबर रोजी पुण्यातील मोहम्मदवाडी परिसरातील डॉ. गायकवाड यांच्या घरी गेले होते. यावेळी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी अण्णा धामधरे यांनी डॉ. गायकवाड यांना धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास त्यांच्या घरी लोक पाठवून मारहाण केली जाईल, अशी धमकी दिल्याचे FIRमध्ये नमूद आहे. डॉ. गायकवाड यांनी आपण पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त असून, कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे केवळ सदस्य आहोत आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्याचा उल्लेख FIRमध्ये आहे.

गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिव्या शिंदेसह काही जण न्याती हायलँड्स येथील त्यांच्या निवासस्थानी आले. यावेळी लाकडी दांडका, बेल्ट आणि भांड्याने डॉ. गायकवाड यांना मारहाण केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच घरातील वस्तूंची तोडफोड करून 5 लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यांच्या मुलालाही धमकी दिल्याचे FIRमध्ये नमूद आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महेंद्र गायकवाड पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर डॉ. गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिव्या शिंदेसह इतरांवर गंभीर कलमांखाली गुन्हा

डॉ. गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिव्या शिंदे, अण्णा धामधरे आणि इतरांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये खंडणी, दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या आरोपांशी संबंधित कलमांचा समावेश आहे.

पोलिसांनी घटनास्थळाच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कोण आहे दिव्या शिंदे?

दिव्या शिंदे सोशल मीडियावर ‘सरकार’ या नावाने ओळखली जाते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये ‘बिग बॉस मराठी सीझन 6’मधून तिला बाहेर करण्यात आले होते. सहस्पर्धकांना धमकावल्याच्या आरोपांनंतर ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे. दिव्या शिंदेचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असल्याचे सांगितले जाते. ती पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या मोबाईलवर SMS आला का?

SCROLL FOR NEXT