Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss फेम अभिनेता आहे दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमात, म्हणाला ती माझी क्रश...

Pushkar Jog : मराठी अभिनेता पुष्कर जोग आपल्या अभिनयाने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. नुकतेच त्यांनी आपल्या क्रश विषयी खुलासा केला आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेता पुष्कर जोग आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने अनेक हिट चित्रपट केले आहेत. बिग बॉस मराठी सीझन १ चा पुष्कर रनरप होता. बिग बॉसच्या (Bigg Boss) घरातही त्याने आपल्या कमाल गेम खेळून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पुष्कर जोग (Pushkar Jog) हा अभिनेत्यासोबतच निर्माता देखील आहे.

पुष्कर जोगने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला एका अभिनेत्रीवर क्रश आहे. ती अभिनेत्री मराठमोळी असून ती आता बॉलिवूड आणि साऊथमध्ये काम करते. तिला बॉलिवूड आणि साऊथमध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. ही अभिनेत्र दुसरी तिसरी कोणी नसून मृणाल ठाकूर आहे. पुष्करने मुलाखतीत सांगितले की, " मला मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) खूप आवडते. ती माझी क्रश आहे. मला तिच्यासोबत काम करायला देखील आवडेल. माझी तशी इच्छा देखील आहे. हल्ली ती माझ्या मेसेजचे रिप्लायही देते. मी तिचा स्पॉटबॉयही बनेन इतकी ती मला आवडते. मला मृणालशी मैत्री करण्याची इच्छा आहे."

पुष्कर जोगने एअर हॉस्टेस जास्मीन ब्रह्मभटसोबत (jasmine brahmbhatt) 2014 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना एक गोंडस मुलगी देखील आहे.

नुकताच 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण झाला. सध्या महाराष्ट्रातून त्याला भरपूर प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे आता‘बिग बॉस 18’ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 'बिग बॉस 18'चे होस्टिंग सलमान खान करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT