Ankita Walawalkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: हाच का होणारा नवरा? अंकिताच्या जुन्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस, नेटकऱ्यांचा अंदाज खरा ठरणार?

Kokan Hearted Girl Ankita Walawalkar:बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी अंकिताने तिच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय बद्दल सांगितले होते. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5मुळे चर्चेत आलेली कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर. बिग बॉसच्या घरात अंकिताच्या खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय अंकिता तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत होती. बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी अंकिताने तिच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉय बद्दल सांगितले होते. ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

काय होती अंकिताची पोस्ट

बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी अंकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये, अंकिताने तिच्या होणाऱ्या साथीदाराबद्दल सांगितले होते. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी कोकण हार्टेड बॉयने दिलेल्या शुभेच्छांबद्दल ही पोस्ट होती. त्यामुळे हा कोकण हार्टेड बॉय नक्की आहे तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला होता.

सोशल मीडियावर अंकितासोबतची कोकण हार्टेड बॉयची पोस्ट व्हायरल होत आहे. अंकिताच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉयचं नाव आहे कुणाल भगत. सोशल मीडियावरील अंकिताच्या जुन्या फोटोंवर नेटकरी कमेंट करत आहेत. याबाबत अद्याप अंकिताने अधिकृतपणे काही माहिती दिली नाही.

अंकिताने माध्यमांना दिलेल्या तिच्या एका मुलाखतीत बिग बॉस संपल्यानंतर मी लकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले होते. नुकतंच बिग बॉसचा ग्रँड फिनाले संपल्यानंतर एका नेटकऱ्याने, अंकिताला अंकिताला प्रश्न विचारला होता की, तुझा नवरा कोण आहे आता सांग ना… झालं आता बिग बॉस, असं विचारलं होतं यावर अंकिताने 12 ऑक्टोबर असा रिप्लाय दिला. त्यामुळे 12 ऑक्टोबरला अंकिता तिच्या आयुष्यातील कोकण हार्टेड बॉयचा खुलासा करणार असल्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT