Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : "तलवार चालवेन..."; दिव्याला सदस्यांना धमकी देणं पडलं महागात, बिग बॉसनं दाखवला बाहेरचा रस्ता|VIDEO

Divya Shinde Evicted : 'बिग बॉस मराठी 6' च्या घरातून दिव्याचा पत्ता कट झाला आहे. तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे तिला बिग बॉसने थेट घराबाहेर काढले आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरातून दिव्या शिंदेचा पत्ता कट झाला.

दिव्या घरातील सदस्यांना धमकी देते.

बिग बॉस थेट दिव्याला शोमधून काढण्याचा निर्णय घेतात.

बिग बॉसच्या घरात रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. घरात शॉकिंग घटना घडली आहे. ज्यामुळे बिग बॉसने दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दिव्याला सोशल मीडियावर 'सरकार' या नावाने ओळखले जाते. बिग बॉसच्या घरात एका टास्क दरम्यान घरातील सदस्य एकमेकांच्या चेहऱ्यावर फुली मारताना दिसतात. तेव्हा तन्वी आणि दिव्यामध्ये मोठा वाद होतो.

बिग बॉस स्वतः दिव्याला शांत होण्यासाठी सांगताना दिसले. मात्र दिव्या कुणाचे ऐकून घेत नव्हती. त्यानंतर दिव्या सर्वांसमोर बोलते की, बिग बॉस मला तुमच्याबद्दल आदर आहे. तुमच्यावर विश्वास आहे म्हणून येथे आली आहे. मला तुम्हाला दुखावण्याचा नाही. मला सध्या खूप लोकांकडून समजलं आहे की, मी शोमध्ये बाहेरच्या गोष्टी बोलते... पण मला आठवत नाही मी नेमकं काय बोलले? त्यानंतर दिव्या धमकी देते. दिव्याने दिलेली धमकी पाहून तन्वी, रुचिता, अनुश्री तिघी भडकतात. तसेच बिग बॉसच्या घरातील तिचा भाऊ राकेश बापटही याचा विरोध करतो.

दिव्याची धमकी

दिव्या म्हणते की, "मी बाहेर 'सरकार' म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. आता ती तलवार घरी असेल, याचा अर्थ असा नाही की, मी इथल्या गोष्टी विसरेन...मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन. आता ती तलवार कोणावर चालवेन हे depend करते तुम्ही माझ्याशी किती आणि कसे बोलताय..." दिव्या आपण धमकी देत असल्याचे कबुल देखील करते.

दिव्याची धमकीनंतर बिग बॉस तिची चांगली शाळा घेतात. ती बिग बॉसची आणि घरातील सदस्यांची माफी मागण्यासही नकार देते. त्यानंतर बिग बॉस दिव्याकडे नॅशनल टेलिव्हिजनवर घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबद्दल स्पष्टीकरण मागतात. थोड्यावेळाने बिग बॉस दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय सुनावतात. आता भाऊच्या धक्क्यावर या आठवड्यात कोण घराबाहेर जात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT