Bigg Boss Marathi 6 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: 'महाराष्ट्राला पटलेलं नाही...'; राकेशसोबत झालेल्या भांडणामुळे रितेश देशमुख भडकला, विशाल कोटियनला सुनावलं

Bigg Boss Marathi 6: मध्ये विशाल-राकेश वादानंतर रितेश देशमुखने विशालला सुनावलं आहे. धक्काबुक्की आणि वैयक्तिक टीकेमुळे प्रकरण तापलं, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6: ‘‘बिग बॉस’ मराठी ६’मध्ये सध्या प्रचंड वाद आणि नाट्य पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये शोचा होस्ट रितेश देशमुख यांनी स्पर्धक विशाल कोटियनला जोरदार सुनावल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून घरात नॉमिनेशन टास्कदरम्यान मोठे वाद झाले. विशेषतः राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यातील भांडणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या वादादरम्यान विशालने राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर, विशेषतः घटस्फोटावर टिप्पणी केल्यामुळे वातावरण अधिकच तापले.

प्रकरण इतके चिघळले की, दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर हा वाद फक्त घरापुरता मर्यादित न राहता बाहेरही गाजला. सोशल मीडियावर अनेकांनी राकेश बापटला पाठिंबा दिला, तर विशालच्या वागण्यावर जोरदार टीका करण्यात आली.

आता ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागात रितेश देशमुखने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रोमोमध्ये ते विशालला स्पष्ट शब्दांत म्हणताना दिसतात की, “तुम्ही राकेशला धक्का नाही मारला, तर ट्रॉफीला धक्का मारला आहे.” तसेच त्यांनी हे वर्तन अजिबात स्वीकारार्ह नसल्याचे सांगत, “महाराष्ट्राला हे पटलेलं नाही,” असेही ठामपणे सुनावले.

दरम्यान, या वादावर राकेश बापटच्या कुटुंबीयांनीही संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी वैयक्तिक आयुष्यावर बोलणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. ‘Bigg Boss Marathi 6’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, अशा वादांमुळे शोची रंगत अधिकच वाढली आहे. प्रेक्षकांचे लक्ष आता येणाऱ्या भागाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT