Bigg Boss Marathi 6 Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसमध्ये नवा ट्विस्ट; वाइल्डकार्ड संकेत ठरला 'किंग', राखी सांवतला दिली कॅप्टनशिप

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात पॉवर की टास्कमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. वाइल्डकार्ड स्पर्धक संकेतने आपली पॉवर की सुरक्षित ठेवत इतरांपेक्षा आघाडी घेतली.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6: रिअॅलिटी शो बिग बॉसच्या घरात दररोज काही ना काही नवे ट्विस्ट पाहायला मिळत असतात. या आठवड्यातही घरात झालेल्या एका खास टास्कमुळे वातावरण चांगलेच रंगले. वाइल्डकार्ड स्पर्धकांसाठी ठेवण्यात आलेल्या ‘पॉवर की’ टास्कमध्ये अनेक उलथापालथी झाल्या, पण या सगळ्या गोंधळात वाइल्डकार्ड स्पर्धक संकेत मात्र आपली की सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे तो सध्या घरात चर्चेचा विषय बनला आहे.

बिग बॉसने वाइल्डकार्ड एंट्री घेतलेल्या स्पर्धकांसाठी एक खास टास्क दिला होता. या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाला एक ‘पॉवर की’ देण्यात आली होती. ही की पुढील खेळात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्यामुळे प्रत्येकाला ती जपण्याची जबाबदारी होती. मात्र टास्क सुरू होताच घरातील समीकरणे बदलू लागली.

टास्कच्या पहिल्याच दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. स्पर्धक संस्कृतीकडील पॉवर की विशालने मिळवली. त्यानंतर रेवाकडील की देखील विशालने आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे विशालकडे दोन की गेल्यामुळे घरातील इतर स्पर्धकांमध्ये खळबळ उडाली. मात्र हा फायदा त्याच्याकडे जास्त वेळ टिकला नाही. रुचिता पुढे सरसावली आणि तिने विशालकडून रेवाची पॉवर की परत हिसकावून घेतली. त्यामुळे घरात कींचा खेळ सतत बदलत राहिला.

या सगळ्या गोंधळात मात्र संकेतने शांतपणे आणि रणनीतीने आपली पॉवर की सुरक्षित ठेवली. इतर स्पर्धकांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा आणि वादांमध्ये न पडता त्याने स्वतःची की जपली. त्यामुळे वाइल्डकार्ड एंट्रींपैकी आपली की सुरक्षित ठेवणारा तो एकमेव स्पर्धक ठरला.

यानंतर बिग बॉसने सर्व स्पर्धकांना आपापल्या पॉवर की दाखवण्यास सांगितले. त्या वेळी संकेतने आत्मविश्वासाने आपली की सादर केली आणि त्याचा हा छोटा विजय घरात चर्चेचा विषय ठरला. बिग बॉसने पुढील खेळ अधिक ट्विस्टेड होणार असल्याचेही संकेत दिले. आता संकेतकडे असलेली ही पॉवर की पुढील टास्कमध्ये किती प्रभाव टाकते आणि घरातील समीकरणे कशी बदलतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT