Bigg Boss Marathi 6 Winner  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6 Winner-Tanvi Kolte : 'बिग बॉस मराठी ६' ची विजेता कोकणची मुलगी तन्वी कोलते ठरली आहे. तन्वी कोलतेचा प्रवास जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' ची विजेता तन्वी कोलते ठरली आहे.

तन्वीला बिग बॉसच्या घरातील 'टास्क क्वीन' म्हणून ओळखले जाते.

तन्वी कोलतेने 'बिग बॉस मराठी ६' ची ची ट्रॉफी उचलली.

'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले आज (१९ एप्रिल) ला थाटामाटात पार पडला. 'बिग बॉस मराठी ६' ला आपला विजेता भेटला आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तन्वी कोलतेने उचलली आहे. बिग बॉसच्या सुरूवातीपासून तन्वी कोलतेचे नाव विजेतेपदासाठी चर्चेत होते. कोकणची मुलीने फार कमी वयात मोठे यश मिळवले आहे. बिग बॉसच्या घरात रितेश भाऊंनी तिच्या खेळाचे कायम कौतुक केले. तिला बिग बॉसची 'टास्क क्वीन' म्हणून ओळखले गेले. तन्वी कोलतेचा संघर्षमय प्रवास जाणून घ्या.

तन्वी कोलतेने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. तन्वी कोलते ही मुळची कोकणातील रत्नागिरीची रहिवासी आहे. खूप कष्ट करून तन्वीने या ग्लॅमरच्या दुनियेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तन्वीचे बालपण अत्यंत साधे होते. लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तन्वी कोलतेचा जन्म ७ फेब्रुवारी १९९८ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. सामान्य कुटुंबातून आलेल्या तन्वीने तिथेच आपले शिक्षण पूर्ण केले, पण तिची मोठी स्वप्ने होती. तन्वी कोल्टे २८ वर्षांची आहे. तन्वी कोलतेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती छोट्या-मोठ्या नाटकांमध्ये दिसली. ती सोशल मीडियावर कंटेंट बनवायची, तेव्हा तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

करिअर

तन्वी कोलतेला करिअरच्या सुरुवातीच्या काळात सतत नकाराचा सामना करावा लागला. कधी तिच्या दिसण्यावर तर कधी तिच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केले गेले, पण तिने कधीही हार मानली नाही. तिला तिच्या रंगावरून आणि पेहरावावरून अनेकदा ट्रोल केले गेले. तिच्या मेहनतीने तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि हळूहळू मराठी टीव्ही मालिकांमध्ये आपले स्थान निर्माण केले. तिने विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. मात्र तिला खरी ओळख 'लक्ष्मी निवास'मुळे मिळाली. तर 'बिग बॉस मराठी ६' मुळे तन्वी कोलते रोतोरात स्टार झाली. ती एक स्पष्टवक्ता आहे.

मालिका अर्धवट सोडली...

तन्वी कोलतेने मराठी मालिका 'लक्ष्मी निवास' मध्ये काम केले आहे. 'लक्ष्मी निवास' नंतर तन्वीने 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात पाऊल ठेवले आणि गेमने प्रेक्षकांचे मन जिंकले. रितेश भाऊंनी दिलेले सल्ले आणि कौतुक यांचा समतोल राखत तन्वी कोलते 'बिग बॉसची राणी' झाली. आयुष संजीवसोबत तन्वी कोलते बिग बॉसच्या घरात आली. तन्वीने 'लक्ष्मी निवास' या मालिकेत सिंचना संपत गाडेपाटीलची भूमिका साकारली. मात्र अभिनेत्रीने मालिका अर्धवट सोडून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.

बाबा गेले तेव्हा...

तन्वीने एका मिडिया मुलाखतीत सांगितले होते की, बाबा गेल्यानंतरचा काळ तिच्यासाठी खूप अवघड होता. ती मुलाखतीत म्हणाली की, माझे बाबा गेले त्या दिवशी मी रडले नाही. मी बाबांच्या बॉडीवरचे कपडे बदलले. डायपर चेंज केलं. त्यांच्यासाठी आणलेले नवीन कपडे घातले. नवीन शूज घेतले. आता मला प्रत्येक गोष्टीत त्यांची आठवण येते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्या वडीलांना गंभीर आजार झाला, या सर्वात कुटुंबाला सांभाळताना तन्वी खूप कणखर बनत गेली.

बिग बॉसचा प्रवास

तन्वी कोलते बिग बॉसच्या घरात 'काटा' गटाची सदस्य होती. सीझनमध्ये तन्वीचे सागर कारंडेशी मोठा भांडण झाले. कॅप्टन्सी कार्यात तन्वीने सागरच्या प्रोफेशनवर भाष्य केले, जे अवघ्या महाराष्ट्राला खटकले. तसेच बिग बॉसच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिचे दीपाली सय्यदसोबतही भांडण झाले. रुचिता जामदार आणि तन्वी कायम एकमेकांच्या विरोधात दिसल्या. बिग बॉसच्या घरात तन्वीचे राकेश बापट आणि प्रभू यांच्यासोबत चांगली मैत्री झाली. आपला यशस्वी गेम खेळत तन्वी पहिली 'बिग बॉस मराठी ६' ची पहिली फायनलिस्ट बनली. तिने 'तिकिट टू फिनाले' जिंकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी

Oral Medicines: सरकारचा नवा नियम; आता मेडिकलमधून कोणालाही मिळणार नाहीत ही औषधं, जाणून घ्या कारण

Sairat 2: 'सैराट २' येणार का? नागराज मंजुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, 'चांगली कथा असेल तरच...'

ITR Update : वेळेत आयटीआर भरला तरीही रिफंड अडकू शकतो; एका चुकीमुळे भरावा लागेल दंड

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

SCROLL FOR NEXT