Bigg Boss Marathi 6 Grand Finale SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

BBM 6 Grand Finale - Deepali sayed Eliminated : 'बिग बॉस मराठी ६ ' च्या ग्रँड फिनालेला सुरूवात झाली आहे. टॉप ५ मध्ये येऊन बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' पत्ता कट झाला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६ ' च्या ग्रँड फिनालेला सुरूवात झाली आहे.

ग्रँड फिनालेचे पहिले एलिमिनेशन पार पडले.

बिग बॉसच्या घरातून 'रणरागिणी' पत्ता कट झाला.

अखेर 'बिग बॉस मराठी ६ ' च्या ग्रँड फिनाले सुरू झाला आहे. रितेश भाऊंनी धमाकेदार एन्ट्री घेतली. ‘बिग बॉस मराठी ६’ च्या ’ ग्रँड फिनालेला रितेश भाऊंची बायको बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख आली. जिनिलियासोबत बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन देखील आला. लवकरच रितेश देशमुख, जिनिलिया आणि अभिषेक बच्चन यांचा राजा शिवाजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच ग्रँड फिनालेचे पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. टॉप ५ मध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे स्पर्धक होते. ग्रँड फिनालेचे पहिले एलिमिनेशन खूपच धक्कादायक ठरले. रितेश भाऊंनी सदस्यांना दोन ऑप्शन दिले. पहिल्या ऑप्शनमध्ये ५ लाख रुपये घेऊन स्वतःला एलिमिनेट करायचे होते, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये रितेश भाऊ कमी मते मिळालेल्या सदस्याचे नाव सांगणार होते.

घरातील ५ सदस्यांनी दुसरा ऑप्शन निवडला. त्यामुळे सर्वात कमी मते मिळाल्यामुळे 'बिग बॉस मराठी ६ ' च्या घरातून 'रणरागिणी' दिपाली सय्यदची (BBM 6 Grand Finale - Deepali sayed Eliminated) एक्झिट झाली.

टॉप-४ फायनलिस्ट कोण?

  1. तन्वी कोलते

  2. अनुश्री माने

  3. विशाल कोटियन

  4. राकेश बापट

कोण होणार विजेता?

'बिग बॉस मराठी ६ ' च्या सुरुवाती पासून विजेतेपदासाठी तन्वी कोलते, विशाल कोटियन, राकेश बापट यांची नावे सर्वात जास्त चर्चेत आहे. आता काही मिनिटांत रितेश भाऊ 'बिग बॉस मराठी ६ ' चा विजेता घोषित करतील.

ग्रँड फिनाले कुठे पाहाल?

‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले आज 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच रविवारी पार पडत आहे. ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT