Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : गुलीगत सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचे शूटिंग सुरू, 'या' कलाकारांची लागली वर्णी

Suraj Chavan Zapuk Zapuk Movie Muhurta: 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' खूप गाजला. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) झाला. सूरजला महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळाले. त्याने आपल्या बिग बॉसच्या घरातील वागण्यामुळे अनेकांची मने जिंकली. सूरज चव्हाणचा मोठा चाहता वर्ग आहे. सूरजच्या सोशल मीडियावरील रील्स खूपच व्हायरल होतात. एकीकडे सूरजचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. तर दुसरीकडे सूरज आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

सूरज चव्हाण आता 'झापुक झुपूक' (Zapuk Zapuk Movie) या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी 5'च्या फिनालेला सूरज विजेता झाल्यावर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटाची घोषणा केली होती आणि आता चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहते देखील सूरजच्या नव्या चित्रपटासाठी आतुर असलेले पाहायला मिळत आहेत.

'झापुक झुपूक' चित्रपटातील अभिनेत्री दीपाली पानसरे हिने सोशल मीडियावर चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने खूप हटके कॅप्शन दिले आहे. तिने पोस्टमध्ये "मॅनिफेस्ट मॅजिक, काम करण्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो आणि शेवटी तो क्षण आला..." तसेच सध्या सर्वत्र सूरज आणि त्याच्या टीमवर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

चित्रपटातील कलाकार

मुहूर्ताला सूरज, केदार शिंदे यांच्यासोबत चित्रपटातील इतर कलाकारही पाहायला मिळाले आहेत. सूरजसोबत 'झापुक झुपूक' चित्रपटात पुष्कराज चिरपुटकर, जुई भागवत,दीपाली पानसरे आणि पायल जाधव हे कालाकार पाहायला मिळणार आहेत. या जबरदस्त चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि बेला केदार शिंदे करणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

SCROLL FOR NEXT