Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : 'डोक्यावर पदर अन् शांत स्वभाव...' गुलीगत सूरजला हवी अशी नवरी, वाचा...

Shreya Maskar

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी 5 ची ट्रॉफी उचलली आहे. शो जिंकल्यामुळे सूरजचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्याला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत 14.6 लाख रुपये मिळाले.

बारामतीजवळच्या मोढवे गावात राहणाऱ्या सूरजची आता संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या विजयानंतर सूरज (Suraj Chavan ) अनेक मुलाखती देताना पाहायला मिळत आहे. त्याच्याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक आहेत. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. सूरजने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नासंबंधित काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

सूरजला मुलाखतीत विचारलं की, तुझा लग्नाचा काय प्लान आहे? त्यावर सूरज बोला की, "करायचं आहे पण लगेच नको. कारण संसाराला लागलो की कामाला लक्ष देता येत नाही. पण करायचंय तर आहे." त्यानंतर सूरजला कशी मुलगी हवी हे सांगितले आहे. तो म्हणाला की, "मला चांगली शिकलेली मुलगी हवी. तिचा माझ्यावर खूप विश्वास पाहिजे. तसेच मला समजून घेणारी आणि शांत स्वभावाची साधी साडी नेसणारी मुलगी मला हवी. मला दुसरे ड्रेस घालणाऱ्या मुली आवडत नाही. मला डोक्यावर पदर घेणाऱ्या मुली आवडतात आणि गावाकडेची साधी मुलगी हवी. "

सूरज खूप वाईट परिस्थितीतून वर आला आहे. त्याचे आई-वडील लहानपणीच वारले. त्याला पाच बहिणी आहेत. सूरजला त्यांनीच सांभाळले आहे. तो सोशल मीडियावर तो रील बनवत होता. आता सूरज 'बिग बॉस'च्या नावाच घर देखील बांधणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratan Tata Love Life: भारत-चीन युद्धानं मोडलं रतन टाटा यांचं लग्न; जाणून घ्या भारतीय उद्योगपतीची अधुरी प्रेम कहाणी

Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

Ratan Tata death : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, देशावर शोककळा

IND vs SL W : भारताच्या लेकींनी श्रीलंकेला चारली धूळ; टॉप-२ मध्ये हरमनसेनेची एन्ट्री

Ajit Pawar : 'दादा बारामतीतून तुम्हीच लढा'; अजित पवारांना कार्यकर्त्यांचा आग्रह, नेमकं काय राजकारण शिजतंय? वाचा

SCROLL FOR NEXT