Suraj Chavan Wedding  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Wedding : सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोसोबत अंकिता वालावलकरनं शेअर केला फोटो, म्हणाली- "खरंच लग्न जमलंय"

Ankita Walawalkar Post : अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणच्या घरी पोहचली. तिने होणाऱ्या वहिनीसोबतचा खास फोटो देखील शेअर केला आहे.

Shreya Maskar

अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाणची भेट झाली आहे.

अंकिता वालावलकरने सूरजच्या होणाऱ्या बायकोसोबत फोटो शेअर केला आहे.

अंकिताने सूरज लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे.

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच त्याने एका मुलीसोबत साऊथ इंडियन स्टाइलमध्ये फोटो शेअर केला होता. ज्यामुळे सूरज चव्हाणच्या लग्नाच्या (Suraj Chavan Wedding) चर्चांना उधाण आले. आता मात्र सूरज चव्हाणच्या बहिणीने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात असल्यापासून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकरला (Ankita Walawalkar ) आपली बहीण मानतो. बिग बॉसनंतर ही दोघेही हे नाते जपत आहे.

अंकिता वालावालकरने नुकताच एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यातून तिने सूरज चव्हाणचे खरंच लग्न ठरल्याचे सांगितले आहे. नुकतीच अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिने सूरजच्या नवीन घराचे काम पाहिले. तसेच सूरजच्या होणाऱ्या बायकोला भेटली. तिच्याशी गप्पा मारल्या अंकिताने इन्स्टाग्रामवर होणाऱ्या वहिनीसोबत फोटो शेअर करून त्यावर लिहिलं की, "सूरजला खूप खूप शुभेच्छा, लग्नाला येणे शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट..."

सूरजच्या लग्नाला अंकिता जाऊ शकणार नसल्यामुळे तिने दादा-वहिनीची आधीच भेट घेतली आहे. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सूरजचे घर दाखवत आहे. तसेच होणाऱ्या वहिनीचे कौतुक देखील करत आहे. अंकिता म्हणते की, "सूरजच्या लग्नाला जाणे कदाचित मला शक्य होणार नसल्याने ही एक सदिच्छा भेट आहे. खरंच सूरजच लग्न जमलं आहे. मुलगी सुद्धा खूपच गोड आहे. लवकरच तो तुम्हाला गुडन्यूज देणार आहे... "

ankita walawalkar

अंकिता वालावालकरच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच चाहते सूरजला शुभेच्छा देत आहेत. आता सूरज आपल्या होणाऱ्या बायकोचा चेहरा कधी दाखवणार तसेच लग्नाची अधिकृत गुडन्यूज कधी देणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT