Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

'...आय लव्ह यू' गुलीगत सूरजची Bigg Boss नंतर पहिली Reel, पाहा VIDEO

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणवर सध्या प्रेमाचा वर्षाव होत आहे. अशात सूरजने आता बिग बॉसनंतर आपली पहिली रील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) यंदा चांगलच गाजलं आहे. कमी दिवसातही या शोने जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला. त्याला महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळत आहे. आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात जागा निमार्ण केली. सूरजला अनेक मोठ्या कलाकारांचा पाठिंबा पण होता.

'बिग बॉस मराठी 5' झाल्यानंतर आता सूरज चव्हाणने आपल्या सोशल मीडियावर पहिली रील शेअर केली आहे. यात त्यांनी एका गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणे दुसरे तिसरे कोणाचे नसून बिग बॉसच्या घरातील सूरजचा खास मित्र आणि 'बिग बॉस मराठी 5' चा उपविजेता अभिजीत सावंत यांचे आहे. अभिजीतच्या 'मोहब्बतें लुटाऊंगा' या गाण्यावर सूरज कमाल डान्स स्टाईल हावभाव करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.अनेक कमेंट्स आणि लाईक्स या व्हिडीओला येत आहेत.

सूरजने या व्हिडीओला खास हॅशटॅग दिले आहेत. त्यांनी गुलीगत, झापूक झुपूक, विजेता, बिग बॉस असे कॅप्शनमध्ये टाकले आहे. सूरजच्या या व्हिडीओवर अभिजीतने देखील एक खास कमेंट केली आहे. अभिजीतने लिहिलं की, "सूरज, आय लव्ह यू". अभिजीतने हे गाणे इंडियन आयडलमध्ये गायले होते.

सूरजने नुकतीच केदार शिंदेची भेट घेतली. बिग बॉसनंतर यांच्यात खूप खास नात निमार्ण झाल आहे. केदार शिंदे यांनी सूरजला विठ्ठलाची मूर्ती गिफ्टमध्ये दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: पुण्यात अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT