Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : गुलीगत सूरजचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाला- माझी माणसं...

Suraj Chavan Reaction On Trolling : 'गुलीगत किंग' सूरज चव्हाण सध्या 'झापुक झुपूक' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. आता त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून त्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी 5' फेम सूरज चव्हाणची (Suraj Chavan ) हवा पाहायला मिळत आहे. त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला रिलीज झाला आहे. सूरजचा सोशल मिडिया मोठा चाहता वर्ग आहे. सूरजचा त्याला या मिळणाऱ्या यशामुळे कौतुकासोबत अनेक वेळा ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले आहे. मात्र तरीही सूरजने आपली मेहनत कमी केली नाही.

सूरज चव्हाणने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून त्याने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सूरज 'झापुक झुपूक' चित्रपट सुरू असताना एल्प्रो चिंचवडमधील थिएटरमध्ये गेला. त्याला लोकांचे भरभरून प्रेम पाहायला मिळाले. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सर्वजण त्याचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे.

एक लहान मुलगा सूरजला बोलतो की, "मी तुम्हाला भेटून खूप आश्चर्यचकित झालो आहे. मी बिग बॉस मराठी पाहायचो. " तर एक दुसऱ्या मुलीला सूरजला पाहून तर रडू कोसळले आहे. ती मुलगी म्हणते की, "मी तुमचा चित्रपट आज दुसऱ्यांदा पाहायला आले आहे."

सूरजने या खास व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "एल्प्रो चिंचवड च्या थेटरात आज आपल्या पिक्चरच्या प्रेक्षकांना भेटायला गेलतो…मला जी नावं ठेवत्यात, आमच्या पिक्चरचे जे नको नको ती वीडियो टाकत्यात त्या पेक्षा जी माझी लोक माझ्यावर प्रेम करत्यात ती माझ्यासाठी लई म्हंजी, लई म्हंजी, लई जास्त महत्वाची ह्यात…आणि त्यांच्यासाठी मी आयुष्यभर मेहनत करणार आणि तुम्हाला मी आयुष्यभर हसावणार...तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असचं राहुद्या..." सूरजच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT