Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : 'एका बुक्कीत टेंगूळ...' गुलीगत सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, पाहा खास VIDEO

Zhapuk Zhupuk Shooting Complete : सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या यासंदर्भात दिग्दर्शक केदार शिंदे आणि सूरजने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) कायमच चर्चेत राहिला आहे. सध्या त्याच्या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. त्याचा 'झापुक झपूक' (Zhapuk Zhupuk ) चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजच्या 'झापुक झपूक' चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. याचा एक खास व्हिडीओ केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. केदार शिंदे सूरज चव्हाणच्या 'झापुक झपूक' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

2024 मध्ये 'बिग बॉस मराठी 5' चा महाअंतिम सोहळा पार पडला. सूरज चव्हाण याने बिग बॉसची ट्रॉफी उचलली. तेव्हा महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदे यांनी 'झापुक झपूक' चित्रपटाची घोषणा केली होती. तर डिसेंबर 2024च्या अखेरीस चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 'झापुक झपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर करून चित्रपटाचे शूटिंग संपल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी या पोस्टला खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "बाप्पाच्या आशीर्वादाने सूरज चव्हाणच्या म्हणजेच 'झापुक झुपूक' या धमाल चित्रपटाचे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले. एका बुक्कीत टेंगूळचं...तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असून दे...२५ एप्रिल पासून भेटूया आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..."

केदार शिंदे यांच्या या पोस्टवर कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये केदार शिंदे सूरजला बोलतात की, "पॅकअप" म्हण... तेव्हा सूरज "गॅपअप" म्हणतो. तेव्हा सर्वजण हसू लागतात. हसत आण मस्करी करत अखेर 'झापुक झपूक' चित्रपटाचे शूटिंग समाप्त झाले आहे. दुसरीकडे सूरजने देखील त्याच्या गावातील मरीमातेच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT