Nikki- Sangram Fight Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki- Sangram Fight: "दम असेल तर तोंडावर बोल..." निक्कीने संग्रामसोबत घेतला पंगा; राडा पाहून नेटकरी भडकले

Bigg Boss Marathi Nikki And Sangram Fight: बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोमध्ये निक्की आणि संग्राम यांच्यात चांगलाच राडा झालाय.

Manasvi Choudhary

बिग बॉसच्या घरात मागील काही दिवसांपासून चांगलीच फटकेबाजी सुरू आहे. संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीपासून बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलेलं दिसतंय. संग्रामने एन्ट्री करताच अरबाज आणि निक्कीशी भांडण केली. अशातच आता पुन्हा निक्की आणि संग्राममध्ये वाद झाल्याचं दिसतय.

नुकताच बिग बॉसचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोमध्ये निक्की आणि संग्राम यांच्यात चांगलाच राडा झालाय. बिग बॉसच्या घरामध्ये सोफ्यावर निक्की अरबाज आणि दुसऱ्या बाजूला सुरज, संग्राम, अभिजीत आणि अंकिता बसलेले दिसत आहे. दरम्यान त्यांच्यात कल्ला सुरू आहे. यावेळी संग्राम निक्की आणि अरबाजकडे बघून बोलतो,"जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं" यावर निक्कीला राग येतो ती बोलते की, "फुसक्या बारसारखं घरात बोलायचं नाही. दम असेल तर तोंडावर बोलून दाखव".

पुढे संग्राम निक्कीला बोलतो की, "कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या ते तुम्ही ठरवताय"."स्वत:चं डोकं वापरा आणि नीट बोला". ना तळ्यात ना मळ्यात... तुमची तर अशी परिस्थिती आहे", हे सर्व ऐकून संग्राम म्हणतो, "तुमच्यातील एकाला तुम्हीच घराबाहेर काढणार आहे".

दरम्यान या सगळ्या गोंधळात आता नवीन एपिसोडमध्ये कोण घराबाहेर जाणार आहे. हे पाहणं औत्सुक्याचे असेल. मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरात आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावल्याने तिला घराबाहेर जावं लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT