Ankita Walawalkar Support Pranit More Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Ankita Walawalkar Support Pranit More: ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात एक वाद झाला. त्यानंतर सोशल मीडिया आणि प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली.

Shruti Vilas Kadam

Ankita Walawalkar Support Pranit More : ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये नेहमीच वाद आणि मनोरंजक प्रसंग घडत राहतात. अलीकडेच घरातील स्पर्धक प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात एक वाद झाला, जो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. बसीर अलीनं प्रणितवर टीका करताना “गो बॅक टू युवर व्हिलेज” असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर सोशल मीडिया आणि प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली. अनेकांनी या वाक्याचा निषेध केला, तर काहींनी प्रणितला पाठिंबा दिला.

या पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्री अंकिता वालावलकर पुढे आली आणि तिने प्रणित मोरेच्या बाजूने ठाम भूमिका मांडली. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि प्रेक्षकांना आवाहन केले की, “संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांनी आणि गावखेड्यातील प्रत्येकाने प्रणितसाठी वोट द्यावे. बिग बॉसच्या घरात राहणं किती कठीण असतं, हे मी जाणते. प्रणित हा कॅमेऱ्यावर दिसण्यासाठी फेक गोष्टी करणारा नाही. तो प्रामाणिकपणे खेळतो.”

व्हिडीओमध्ये अंकिता म्हणाली, दुसऱ्याला गो बॅक टू युवर व्हिलेज” म्हणत आहे, जसा हा मोठा शहरातूनच आला आहे. गावाकडून आलोय असं म्हणत आहेस. पण तेच गावचे लोक वोट आणि त्याबरोबरच तुझ्यासाठी कपडेही पाठवून देतील. हीच ती वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांनी आणि गावखेड्यातल्या प्रत्येकाने प्रणितला वोट करा. आता आम्हाला बघायचंच आहे की, कोण गावाला जातंय.”

अंकिताच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिक्रिया आल्या आहे. अनेकांनी तिच्या पोस्टखाली प्रणितच्या समर्थनार्थ कमेंट्स केले आहेत. काहींनी बसीर अलीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर अनेक चाहत्यांनी प्रणितला व्होट देण्याचे आवाहन केले आहे. यानंतर, सोशल मीडियावर #VoteForPranit सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत,

हा वाद बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी आणि सोशल मीडियासाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. आगामी टास्क, नॉमिनेशन आणि इतर स्पर्धकांच्या प्रतिक्रियेनंतर या वादाचा शेवट कोणत्या दिशेनं होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT