Ankita Walawalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar : 'कोकण हार्टेड गर्ल'ची लगीनघाई! पार पडलं पहिलं केळवण, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्यानं घेतला हटके उखाणा

Kunal Bhagat Ukhana : 'कोकण हार्टेड गर्ल'चं नुकतच पहिले केळवण पार पडले आहे. केळवणाचा सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात कुणालने भन्नाट उखाणा घेतला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरच्या (Ankita Walawalkar ) घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच अंकिता आणि कुणालचे पहिले केळवण पार पडले आहे. अंकिताही सोशल मिडिया इन्फ्लुएंसर आहे. तर कुणाल संगीत दिग्दर्शक आहे. 'बिग बॉस मराठी'मुळे अंकिताला खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने आपल्या स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अंकिता वालावलकर यावर्षी सुरुवातील लग्नगाठ बांधणार आहे. आता तिच्या लग्नापूर्वीच्या समारंभांना सुरुवात केली आहे. अंकिता आणि कुणालचे (Kunal Bhagat ) कुटुंबासोबत केळवण नुकतेच पार पडले आहे. याचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दोघेही खूप खुश आणि एकमेकांची नावे घेताना पाहायला मिळत आहेत.

कुणालचा उखाणा

कुणालने केळवणासाठी भन्नाट उखाणा घेतला. तो म्हणाला की, "पाटावर पाट, पाटाखाली भुंगा, वालावलकरांची पोरगी पटवली ढांगचिकढींगा" हा उखाणा ऐकताच सर्वजण हसू लागतात.

अंकिताचा उखाणा

अंकिता केळवणात कुणालचे नाव घेत म्हणाली, "समोर आहे बासुंदी खायची झाली मला घाई, कुणालचं नाव घेते सुरू झाली लगीनघाई."

अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "घरचं पहिलं केळवण" तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुणाल भगतने अनेक मराठी लोकप्रिय मालिकांना संगीत दिले आहे. केळवणासाठी अंकिता आणि कुणालने पारंपरिक लूक केला आहे. अंकिताने लाल रंगाची साडी नेसली आहे. तर कुणालने पांढरा शॉट कुर्ता परिधान केला आहे. दोघ एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत. केळवणासाठी फुलांची सजावट आणि केळीच्या पानावर 'केळवण' लिहिलेले पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi Hair Care Tips: होळी खेळताना केसांची काळजी कशी घ्यायची?

T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार! भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी

Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्याआधी हे ३ गंभीर आजार देतात अलर्ट; तज्ज्ञांनी सांगितली नेमकी कारणं, वेळीच व्हा सावध

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरावर पाणी संकट

SCROLL FOR NEXT