Irina Rudakova SAAM TV
मनोरंजन बातम्या

Irina Rudakova: इरिनाने जिंकलं चाहत्यांचं मन; 'बहरला हा मधुमास' गाण्यावर थिरकली 'परदेसी गर्ल', पाहा VIDEO

Navratri 2024 : 'बिग बॉस मराठी 5' फेम इरिना रुडाकोवा हिने नवरात्रीत भन्नाट डान्स केला. त्यामुळे चाहते खूप खुश झाले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi ) या पर्वात अनेक तगडे कलाकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यात 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा (Irina Rudakova) ही देखील सहभागी होती. ती तिच्या ग्लॅमरस अंदाजासाटी ओळखली जाते. ती मूळात परदेशात वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईत राहत आहे. तिचा जन्म जरी परदेशातला असला तरी ती भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. बिग बॉसच्या घरात यावरून तिचे कौतुकही करण्यात आले होते.

सध्या सोशल मीडियावर 'परदेसी गर्ल'चा नवरात्री (Navratri 2024) डान्स व्हायरल होत आहे. इरिनाने नवरात्रोत्सवात 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर डान्स केला आहे. ती या गाण्यावर थिरकताना आणि ठुमके लगावताना दिसत आहे. इरिनाचे हावभाव चाहत्यांना घायाळ करत आहेत. तिने हा डान्स व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. इरिना रुडाकोवा हिच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'बिग बॉस मराठी 5'च्या घरात इरिनाची वैभव चव्हाणसोबत छान मैत्री जमली. इरिना रुडाकोवा ही IPL ची चिअरगर्ल आणि मॉडेल आहे. ती भारतीय संस्कृती खूप फॉलो करते. यामुळे तिने महाराष्ट्राचे प्रेम जिंकले आहे. 'बिग बॉस मराठी' नंतर इरिनाने 'इंद्रायणी' या मालिकेत एन्ट्री घेतली. यंदा 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. तर अभिजीत सावंतने उपविजेता पद भूषवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT