Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss फेम अभिनेत्याने घेतली आलिशान कार, पाहा VIDEO

Nikhil Damle : बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल दामलेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या घरात एका नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) खूप गाजलं आहे. या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण झाला आहे. बिग बॉसमुळे सूरजला खूप लोकप्रियता मिळाली आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक प्रसिद्धीझोतात आले.

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कलाकार नवीन गोष्टी विकत घेत आहेत. काहींनी मुंबईत स्वतःचं हक्काच घर खरेदी केल आहे. तर काहींनी नवीन गाडी खरेदी केली आहे. दिवाळीत प्रत्येकाच्या घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात आता बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल दामले (Nikhil Damle) याने देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. निखिलाच्या घरी एक नवा सदस्यांची एन्ट्री झाली आहे. निखिलाने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक आलिशान कार खरेदी केली आहे.

मराठी अभिनेता निखिल दामले याने इंस्टाग्रामवर पोस्ट करून आपण नवीन गाडी घेतल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. निखिलने नव्या गाडीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "नवीन सदस्याचं स्वागत आहे" निखिलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटसचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक कलाकार देखील त्याला शुभेच्छा देत आहेत. व्हिडीओमध्ये निखिलसोबत त्याचे कुटुंबीय दिसत आहे.

बिग बॉसमुळे निखिल दामलेला भरपूर लोकप्रियता मिळाली. तसेच निखिल अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT