Vaibhav Irina SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

Vaibhav-Irina Romantic Dance In Gym : बिग बॉस फेम वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा यांनी जिममध्ये रोमँटिक डान्स केला आहे. जे पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5 ) संपले जरी असले तरी शो मधील स्पर्धक अजूनही चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉसमुळे घरातील सदस्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजसोबतच अजून एक कपलची चर्चा पाहायला मिळाली. हे कपल दुसरे तिसरे कोणी नसून वैभव चव्हाण (Vaibhav Chavan ) आणि इरिना रुडाकोव्हा (Irina Rudakova ) आहे.

वैभव आणि इरिनाने नेहमीच प्रेक्षकांकडून प्रेम मिळवल आहे. इरिनाने आपल्या सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे या जोडीने पुन्हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. इरिनाने दोघांचा जिममध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरिना आणि वैभव रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. त्यांनी 'देखो ना खुद को जरा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सवर चाहते भन्नाट कमेंट्स करत आहेत.

इरिनाने या डान्स व्हिडिओला एक हटके कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं की, 'देखो ना देखो ना...' तसेच जिममध्ये ऑफर चालू असल्याचे देखील तिने सांगितले आहे. इरिना आणि वैभवचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. एका युजरने लिहिलं की, "बारामतीची सून", तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "फॉरेनची पाटलीण" प्रेक्षकांना ही जोडी खूपच आवडते.

बिग बॉस संपल्यानंतर इरिना आणि वैभव अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. चाहत्यांनी जरी यांना कपल मानले असले तर या जोडीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आहे. नुकतीच इरिनाने डीपी दादांसोबत भाऊबीज साजरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT