Ankita-Suraj SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita-Suraj : कोकण हार्टेड गर्ल अन् गुलीगत सूरजची भेट; शेतात बसली पंगत, पाहा VIDEO

Ankita Meet Suraj : अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणची गावी जाणून भेट घेतली आहे. त्यांनी एकत्र खूप छान वेळ घालवला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5 ) खूप गाजले आहे. यंदा घरात अनेक नाती जुळली आहेत. घरातील सदस्य बिग बॉसनंतरही आपली घरात बनलेली नाती जपताना पाहायला मिळत आहेत. 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण झाला आहे. बिग बॉसमुळे सूरजला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. बिग बॉसनंतर घरातील अनेक सदस्य सूरजला भेटायला त्याची गावी बारामतीला गेले.

आता कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) सूरज चव्हाणची भेट घेतली आहे. अंकिताने सूरजला भेटण्यासाठी मोढवे गाव गाठलं आहे. अंकिता नुकतीच आपल्या गावी कोकणला जाऊन आली. बिग बॉसनंतर सूरजच्या वाढदिवसानिमित्त अंकिताने सूरजला कॉल केला होता. तेव्हा अंकिता फोनवर सूरजला तुला भेटायला येणार आहे असे बोली होती आणि आता अखेर सूरज आणि अंकिताची भेट झाली आहे.

अंकिताने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. अंकिताने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत म्हणजे कुणाल भगतसोबत सूरजची भेट घेतली आहे. यांनी रानात बसून भाकरी अन् चटणीचा आस्वाद घेतला आहे. अंकिता आणि कुणालचे गावात दणक्यात स्वागत करण्यात आले. त्यांनी मंदिरात जाणून देवीचे आशीर्वाद देखील घेतले. तसेच सूरजने कुणालच्या गाण्याचे कौतुकही केले. बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि सूरजचा छान बॉन्डिंग पाहायला मिळाला. सूरजने महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT