Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: हिंदी बिग बॉसमध्ये अरबाजची एन्ट्री? स्व:ताच सांगितलं खरं कारण

Bigg Boss Marathi Arbaz Patel: बिग बॉसच्या मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आगामी हिंदी बिग बॉसच्या अठराव्या सीझनमध्ये खेळताना दिसणार आहे, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी फेम अरबाज पटले सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात अरबाजने प्रेक्षकांची मने जिंकली. निक्की आणि अरबाजच्या खेळीने प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. अशातच मागील आठवड्यात अरबाजने बिग बॉस घरातून एक्झिट घेतली. अरबाज घरातून बाहेर गेल्यानंतर सर्वत्र नाराजीचा सूर पाहायला मिळाला.

बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर अरबाजने माध्यमांना मुलाखती दिल्या. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज हिंदी बिग बॉस 18 मध्ये जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अरबाजने, माझ्याकडे आणखी प्रोजेक्ट्स आहेत. महाराष्ट्राला बघायचं असेल तर... मी नक्की कुठे ना कुठे दिसणार आहे. असं म्हटलं आहे. अरबाज पटेल हा बिग बॉसच्या मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आगामी हिंदी बिग बॉसच्या अठराव्या सीझनमध्ये खेळताना दिसणार आहे, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाजने एक्झिट घेतल्यानंतर घरातील सदस्यांसह चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. पहिल्याच दिवसांपासून अरबाजने आणि निक्कीची मैत्री खूप घट्ट होती. घरात अरबाज आणि निक्की जास्त एकमेकांशी कनेक्टेड होते अशातच अरबाज गेल्यानंतर निक्की एकटी पडल्याचे दिसत आहे. यामुळेच अरबाज आता वाईल्ड कार्ड एन्ट्रीने पुन्हा मराठी बिग बॉसमध्ये? की हिंदी बिग बॉसमध्ये जाणार? हे पाहणं औत्सुक्याचे असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT