Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : तो पुन्हा आलाय... निक्कीसाठी आणलयं स्पेशल गिफ्ट, VIDEO पाहिलंत का?

Arbaz Special Gift For Nikki : बिग बॉस मराठीचा लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्याआधी निक्कीसाठी घरात एक गिफ्ट आलं आहे. ते काय आणि कोण घेऊन आलं आहे, जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र बिग बॉस मराठीची हवा पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष उदया होणाऱ्या ग्रँड फिनालेकडे लागले आहे. बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन खूप गाजला आहे.

'बिग बॉस मराठी 5' चा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर रोजी पार पडणा आहे. आता बिग बॉस घरात नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. बिग बॉस घरात सुरुवातीपासूनच अरबाज-निक्कीच्या मैत्रीची जादू पाहायला मिळत आहे. घरात त्यांच्या मध्ये अनेक भांडणे झाली तरी देखील ते दोघे एकमेकांसाठी कायम उभे राहिलेले पाहायला मिळाले. अरबाज (Arbaz Patel ) एलिमिटेड झाल्यावर निक्कीला खूप वाईट वाटले होते. ती खूप रडते आणि काही दिवस त्याच्या आठवणीत असते.

बिग बॉसच्या घरात रियुनीअन होणार आहे. घरातील सर्व सदस्य पुन्हा घरी येणार आहेत. अरबाजला धावत-पळत बिग बॉसच्या घरात एन्ट्री मारतो आणि निक्कीला (Nikki Tamboli) उचलून घेऊन रडतो. त्यानंतर ती दोघ एकमेकांशी बोलताना पाहायला मिळत आहे. तेव्हा तो निक्कीला 'बाई' असे लिहिलेले ब्रोच दाखवतो. अरबाजच्या पांढऱ्या ब्लेझरवर सोनेरी रंगाचे 'बाई' लिहिलेले ब्रोच खूप उठून दिसत आहे. जे पाहून निक्कीला खूप आनंद होतो. बिग बॉस घरात निक्कीचा 'बाईsss.. हा काय प्रकार!' या वाक्याने महाराष्ट्र गाजवला आहे. सर्वांच्या तोंडामध्ये एकच शब्द 'बाईsss..'

आता पुन्हा एकदा अरबाज आणि निक्कीची बिग बॉसच्या घरात भेट झाली आहे. फॅमिली वीकमध्ये निक्कीचे आई अरबाजचा साखरपुडा झाल्याचे निक्कीला सांगते. त्यामुळे निक्की पुन्हा तुटते आणि अरबाजचा राग करते. तसेत अरबाजशी पुढे संबंध ठेवणार नाही असे बोलते. त्यावर अरबाज मीडियासमोर बोलतो की, "माझा साखरपुडा झालेला नाही" आता पुन्हा झालेली अरबाज निक्कीची ही भेट त्यांच्या नात्यातील दूरावा कमी करेल का? त्यांच्य नात्यांचे भविष्य काही असेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT