Bigg Boss Marathi Season 5 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Season 5: निक्की- अरबाजची जवळीक, गर्लफ्रेंड लिझाने घेतला मोठा निर्णय; म्हणाली काही काळासाठी....

Arbaz Girlfriend Leeza Bindra Post: अरबाज आणि निक्कीची जवळीक वाढल्यानंतर सोशल मीडियावर लीझा देखील चर्चेत आली आहे. नुकतंच लिझाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी हा शो निक्की आणि अरबाज यांच्यामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलिकडेच अरबाज आणि निक्की यांच्यात प्रेमाचे वारे वाहू लागले अशी चर्चा होती. अशातच अरबाजची कथित गर्लफ्रेंड लीझा देखील चर्चेत आली आहे. आता देखील लिझाने मोठा निर्णय घेतला आहे.

बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की यांची केमेस्ट्रीमुळे त्यांच्यामध्ये प्रेमाचं नातं फुललं बोललं जातय. निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीमुळे अनेकदा अरबाजने निक्कीशी भांडण केले. मात्र अलिकडेच अरबाजने त्याची गर्लफ्रेड असल्याचे स्पष्ट केले होते. सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर लीझा बिंद्रा असे तिचं नाव आहे. अरबाज आणि निक्कीची जवळीक वाढल्यानंतर सोशल मीडियावर लीझा देखील चर्चेत आली आहे.

बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजच्या जवळीकनंतर नेटकरी सोशल मीडियावर अरबाजच्या गर्लफ्रेंडला चर्चेत आली आहे. नेटकरी तिला सोशल मीडियावर अरबाज आणि तिच्या नात्यावर प्रश्न विचारत आहे. अशातच लीझाने वैतागून सोशल मीडियावर 'तिला अरबाजविषयी काहीही विचारू नका' अशी पोस्ट केली होती. यानंतर अरबाज आणि लिझाच्या नात्यात दुरावा येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आतादेखील लिझाने सोशल मिडीयावर पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लिझाने तिच्या पोस्टमध्ये, मी काही काळासाठी सोशल मिडिया सोडत आहे. लव्ह यू, हसत राहा. असं म्हटलं आहे. लीझाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Limbu- Mirchi Impotance: लिंबू- मिरची दारावर का टांगतात?

Shocking: मांडीवरून हात फरवला, नंतर टीशर्टमध्ये हात घातला; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT