Bigg Boss Marathi canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिजीतने केली निक्कीची नक्कल

Bigg Boss Marathi Day 60 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मालक आणि सांगकामे यांच्यात धमाल टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये अभिजीत निक्कीची नक्कल करताना दिसणार आहे.

Saam Tv

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज मालक आणि सांगकामे यांच्यात धमाल टास्क पार पडताना दिसत आहे. दरम्यान आजच्या भागात मालक डीपी दादा सांगकामे अभिजीतला निक्कीची नक्कल करायला सांगणार आहेत. अभिजीतने निक्कीची केलेली नक्कल पाहून घरात एकच हशा पिकणार आहे.

जान्हवी अरबाजला निक्कीविरोधात भडकवते. तिची रिअॅक्शन जान्हवीवर काय असणार आणि अरबाजवर काय असणार? असा प्रसंग डीपी दादा अभिजीतला देतात आणि त्यावर निक्कीची नक्कल करायला लावतात.

दरम्यान निक्कीची नक्कल करत अभिजीत म्हणतो,"बाई... तुला माझ्यावर विश्वास आहे तर तू जातो का तिकडे...असं का करतोस तू?". त्यानंतर निक्की अभिजीतला माझी नक्कल करतोस का? असं विचारते. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात डीपी दादा आणि अभिजीत अंकिताबद्दल बोलताना दिसणार आहेत. डीपी दादा म्हणतात,"ती म्हणते अरबाजची गरज का आहे आता?". अभिजीत विचारतो,"पॅडी दादांना तुम्ही पकडलेलं म्हणून".

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. यंदाच्या आठवड्यामध्ये घरातील सर्व सदस्य नॉमिनेट झाले आहे. बिग बॉस मराठीचा ५वा सिझन १०० ऐवजी ७० दिवसांचा असणार आहे अशी अधिकृत घोषणा बिग बॉसकडून करण्यात आली आहे. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये ८ सदस्य आहेत. त्यामधील बिग बॉस मराठी सिझन ५चा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT