Bigg Boss Marathi 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री? तेजू जोरात, स्पर्धक कोमात...

बिग बॉसच्या घरात ग्रॅंड फिनालेची घोषणा होताच गेल्या काही दिवसांपूर्वी काही वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर गेलेल्या तेजस्विनी लोणारीबद्दल एक गुड न्युज समोर आली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: सध्या बिग बॉसच्या चौथ्या सीझन संपायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. येत्या ८ जानेवरीला बिग बॉसच्या चौथ्या सीझनच्या ग्रॅंड फिनालेची घोषणा झाली आहे, त्यामुळे कोणता स्पर्धक बिग बॉसच्या चौथ्या सीझनची ट्रॉफी घरी नेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात ग्रॅंड फिनालेची घोषणा होताच गेल्या काही दिवसांपूर्वी काही वैद्यकीय कारणांमुळे घराबाहेर गेलेल्या तेजस्विनी लोणारीबद्दल एक गुड न्युज समोर आली आहे.

तिच्या हाताला दुखापत झाल्याने तेजस्विनीला बिग बॉसचे घर सोडावे लागले होते. तिची अचानक बिग बॉसच्या घरातून झालेली एक्झिट चाहत्यांना आवडली नव्हती. सोबतच बरेच तिचे सहकारी देखील तिच्या जाण्याने दुखी झाले होते. पण तिच्या हातामुळे तिला घराच्या बाहेर जावे लागले होते. परंतू आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात तेजस्विनी लोणारी स्पर्धक म्हणून एन्ट्री घेत आहे.

नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांनी तेजस्विनीचे जोरदार स्वागत केले आहे. तिच्या एन्ट्रीने सर्वच सदस्य आनंदीत झालेले दिसून येत आहे. सर्वांचाच आनंद फारच द्विगुणीत झाल्याचे दिसून येत आहे. खासकरुन अमृता आणि किरण तेजस्विनीला पाहता फारच आनंदीत झाले.

तिच्या येण्याने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरातील हा आठवडा गाजण्याची शक्यता आहे. हा सीझन संपायला अवघे काही दिवसच बाकी असून सर्व स्पर्धक कंबर कसून तयारीला लागले आहेत. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले येत्या ८ जानेवारीला कलर्स मराठीवर होणार आहे. विजेतेपद कोणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. एका पेक्षा एक वरचढ असलेल्या या स्पर्धकांमध्ये कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT