Bigg Boss Marathi 4 Ruchira Jadhav And Rohit Shinde Together Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'बिछडे हुए दिल' पुन्हा एकत्र आले, रुचिरा रोहितने बिग बॉसच्या घरात घालवले खास क्षण...

'बिग बॉस मराठी 4' मध्ये डॉ.रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हे रिअल लाईफ कपल सामिल झालं होतं.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: २ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या पर्वात एकूण १६ स्पर्धक होते, त्यातील काही स्पर्धक एलिमिनेट होत घराबाहेर गेले. या घरातील प्रत्येक स्पर्धकाची काही तरी वेगळी खासियत आहे. त्यातील एक जोडी म्हणजे, डॉ. रोहित शिंदे आणि अभिनेत्री रुचिरा जाधव.

या जोडीने एकत्र बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. हे खऱ्या आयुष्यातील कपल असून घरात घडलेल्या काही गोष्टींमुळे त्यांच्या रियल लाईफला एक वेगळीच कलाटणी मिळाली. सर्वात आधी बिग बॉसच्या घरातून रुचिरा घराबाहेर पडली तर नंतर रोहित घराबाहेर पडला. घरात असतानाच दोघांमध्येही गैरसमज निर्माण झाले होते, प्रचंड दुरावा आला होता.

पण ज्या घराने त्यांना वेगळं केलं त्याच घरात त्यांच्याच समेट घडतानाही कालच्या भागात दिसले. रुचिरानं घराबाहेर येताच त्याला सोशल मीडियावरून अनफॉलो केलं. सोबतच अनेकदा तिने त्याच्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या दोघांच्या नात्याचं पुढे काय होणार याची चाहत्यांना चिंता असताना दोघेही बिग बॉसच्या घरात पुन्हा एकत्र आले आहेत.

बिग बॉस मधून बाहेर पडताच या जोडीमध्ये चांगलीच फुट पडलेली दिसून आलं. घरात झालेले वाद घराबाहेरही सुरूच राहिले. सोशल मीडियावरही रुचिरानं रोहितला अनफॉलो केलं अन् त्यांच्यात ब्रेकअप होणार अशा चर्चा होऊ आला. रुचिराने वेळ मागितला आहे, असं रोहितने जाहीर केलं. पण त्यांच्यातलं नातं पूर्ववत होईल का नाही ही कुणालाच माहीत नव्हतं. अखेर तो क्षण आलाच.

बिग बॉसच्या घरात ग्रॅंड फिनाले पूर्वी 16 स्पर्धकांचे छोटे खानी गेट-टू-गेदर ठेवण्यात आले होते. सर्वच स्पर्धकांना यावेळी एकत्र घरात जाण्याची संधी एकत्र मिळाली. त्यांच्यासाठी एक छोटी पार्टी देखील अरेंज करण्यात आली होती. यावेळी सर्व स्पर्धकांमध्ये रोहित आणि रुचिराही होते. पण ते दोघेही एकमेकांशी बोलले आहे. जवळपास सर्वच स्पर्धक घरात एकत्र येऊन एकमेकांमध्ये मिसळले, धमाल केली पण त्या दोघांमध्ये अबोला कायम दिसला.

यावेळी प्रसाद जवादेने त्यांच्या नात्याची पुन्हा नव्याने सुरु करण्याचा पुढाकारही घेतला. सर्वजण खीर खात असताना तुम्ही दोघांनी आता झालेले सर्व गैरसमज इथेच सोडा, आणि एक व्हा असं तो म्हणाला. दोघांनाही एकमेकांना खीर भरवण्याचा आग्रह केला. ज्यावेळी दोघेही थोडे अवघडले पण त्यांनी पुढाकार घेत नात्यातील दुरावा मिटवला. आणि ज्या घरात ते वेगळे झाले तिथेच त्यांची मनं जुळून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT