Bigg Boss Wild Card Contestant Entry Instagram/ @bbmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: सोयराबाईंची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री; घर गाजवणार की, फुट पाडणार...

सोयराबाई म्हणून घराघरात प्रचलित असणारी स्नेहलता वसईकर वाईल्ड कार्डमधून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Latest Update: बिगबॉसच्या घरात दिवसेंदिवस मैत्री आणि प्रेमाची समीकरणे खूपच बदलत आहेत. काहींना खेळ खेळायला चांगलाच जोर आलाय तर काहींना झोपेतून जागे करण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या खेळावरुन बिग बॉस सर्वांचीच गोड तिखट शब्दातून चावडीवर हजेरी घेतात. आजच्या भागात 'वाईल्ड कार्ड' नावाच्या रुपाने वादळ येणार आहे.

तिसरा आठवडा तसा बराच चर्चीत होता, टास्क आणि वादविवादात दोन गट झालेले ही दिसले. स्पर्धेतील रस आणखीनच वाढवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शोच्या मध्यात वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. या सर्वांना शेराला सव्वा शेर म्हणून एन्ट्री घेणारी स्पर्धक काय घोळ घालणार हे पुढच्या दिवसांमध्येच कळेल.

सोयराबाई म्हणून घराघरात प्रचलित असणारी स्नेहलता वसईकर वाईल्ड कार्डमधून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेत आहे. तिच्या या धमाकेदार एन्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्नेहलता झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सोयराबाईंच्या भूमिकेत झळकली होती. तिच्या येण्याने घरातील वातावरण कसे बदलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता स्नेहलच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? कोणाच्या नात्यांमध्ये बदल होणार ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येणार आणि कोण सेफ होईल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता स्नेहलता बिग बॉसचं घर कसं गजणवणार याकडे चाहत्यांचे डोळे आहेत. नक्कीच येणारा आठवडा खूपच आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी सोप्या गोष्टी अवघड होऊ शकतात, पाहा राशीभविष्य

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

SCROLL FOR NEXT