Bigg Boss Marathi Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: किरण माने बिग बॉसच्या घरातून बाहेर, मांजरेकरांनी दिली विशेष पॉवर

हा आठवडा सर्वांसाठी स्पेशल असण्याचे कारण एक ऐवजी दोन स्पर्धक 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर पडणार होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Latest Update: 'बिग बॉस मराठी' च्या घरात सर्व सदस्यांना एकत्र राहून यशस्वी ४९ दिवस पूर्ण झाले आहे. तेवढ्या दिवसात 'बिग बॉस मराठी'च्या घरात अनेक तंटे, मस्ती, धम्माल आणि आपापसातील मैत्री ही सर्वांना अनुभवता आली. स्पर्धकांच्या या मैत्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काल बिग बॉसच्या घरात विकेंड चावडी पार पडली. त्या चावडीत काही स्पर्धकांना मांजरेकरांनी घरात जाऊन कानमंत्रही दिला तर काहींना खडेबोल ही सुनावले.

हा आठवडा खूपच जेवढा मजेशीर होता तेवढाच एकमेकांमध्ये वादही निर्माण झाले. स्पर्धकांनी प्रेक्षकांचे स्टॅण्ड- अप कॉमेडीने निखळ मनोरंजन केले. या आठवड्यात बिग बॉसने स्पर्धकांना 'सोसल तेवढेच सोशल' हे उपकार्य सोपवले होते. या उपकार्यात स्पर्धकांनी यशश्री मसुरकर, किरण माने, अमृता देशमुख आणि तेजस्विनी लोणारी या स्पर्धकांना डेंजर झोनमध्ये टाकले होते. हा आठवडा सर्वांसाठी स्पेशल असण्याचे कारण एक ऐवजी दोन स्पर्धक 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर पडणार होते.

बिग बॉसने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सर्व सदस्यांनाच धक्का बसला आहे. शनिवारी झालेल्या यशश्रीच्या एक्सिटनंतर सदस्यांच्या डोक्याचा बराच ताप वाढला आहे. यशश्रीचा काल तब्बल ४९ दिवसांनी प्रवास थांबला. कोणता सदस्य कसा खेळला, कोण चुकलं, कोणत्या स्पर्धकाने टास्क उत्तमरीत्या पार पाडला या सगळ्याचा हिशोब मांजरेकरांनी चावडीवर चुकता केला. तर अमृता धोंगडेला ही तिच्या चुका दाखवून दिल्या.

तसेच काल मांजरेकरांनी चावडीवर सर्व सदस्यांना घरातील आठवणी शेअर करण्यास सांगितले होते. याचसोबत 'VOOT आरोपी कोण' मध्ये या आठवड्यातील आरोपी अपूर्वा नेमळेकर ठरली. बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथ मध्ये विकासला अमृता धोंगडेची चुगली त्याविषयी विकासने तिला स्पष्टीकरण देखील दिले.

असे अनेक गोष्टी झाल्यानंतर या आठवड्यातील दुसऱ्या स्पर्धकाला बाहेर जाण्याची वेळ आली होती. आतापर्यंत चावडीवर असताना मांजरेकर कधीच बिग बॉसच्या घरात गेले नव्हते. मांजरेकर किरण मानेला बिग बॉसच्या घरातून निरोप देण्यासाठी घरात गेले होते. किरण माने घरातून बाहेर जाताना मांजरेकरांनी जाहीर केले की, किरण माने यांचे eviction झाले नाही. तसेच बिग बॉस यांनी किरण मानेंना सांगितले तुम्ही घरातून बाहेर पडलला असला तरीदेखील खेळातून बाहेर नाही पडलात.

बिग बॉसने किरण मानेला अशी कोणती विशेष पॉवर दिली असेल?, काय घडेल पुढे?, किरण माने यांची एंट्री सिक्रेट रुममध्ये झाली. या सिक्रेट रुम मधून किरण माने सर्व सदस्यांचा गेम, बातचीत, संवाद यावर नजर ठेऊ शकणार आहेत. या पुढचा खेळ अजून रंजक होणार असून बिग बॉस आता स्पर्धकांना अजून किती उत्कंठावर्धक खेळ देणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

Bigg Boss Marathi 6 : खानदेशच्या किंगची बिग बॉसच्या घरातून Exit, सचिन कुमावतच्या शॉकिंग एलिमिनेशनमुळे चाहते नाराज

Team India Semi Final Scenario: 'विराट' वाट! भारत आता सेमीफायनलमध्ये पोहचणार का? वाचा संपूर्ण समीकरण

Maharashtra Live News Update: लातूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT