Rakhi Sawat  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: एंटरटेन्मेंट क्विनची एक्झिट, ९ लाखांच्या मोहात राखी पडली अन्...

नुकतेच या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली असून यात एक टास्क पार पडणार आहे. यातून हे दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: अखेर तो क्षण आला! १०० दिवसांपूर्वी अर्थात २ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला हा खेळ कधी अंतिम टप्प्यात आला काही कळलंच नाही. अंतिम टप्प्यात आलेल्या या खेळाला आता लवकरच महाविजेता मिळणार आहे. ऑल इज वेल (All Is Well) म्हणत या सीझनचे दार उघडले आणि एकूण १६ स्पर्धकांमध्ये रस्सी खेच सुरु झाली.

टॉप ५ मध्ये आलेल्या या स्पर्धकांनी आपल्या खेळाला वेगळे वळण देत फिनालेत धडक मारली. नुकतेच या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली असून यात एक टास्क पार पडणार आहे.

परंतू बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर बिग बॉसच्या घरातून एका टास्कदरम्यान स्पर्धकाला हा खेळ सोडावा लागला आहे. ती स्पर्धक म्हणजे, राखी सावंत. या भागात बिग बॉस ३ मधला स्पर्धक विकास पाटील हा कलाकार बिग बॉसच्या घरात आला असून त्याने स्पर्धकांना बॅगेत ९ लाख रुपये देतो, बजर वाजवा आणि घराबाहेर पडा असा म्हणतो.

नुकताच शेअर करण्यात आलेल्या या टीझरमध्ये तो म्हणतो, "माझ्या या बॅगेत ९ लाख रुपये आहेत. समोर या. गजर वाजवा आणि घराबाहेर पडा." बजर वाजवा आणि घराबाहेर पडा." नुकताच ही टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

बिग बॉसच्या चौथ्या सीझनचीच सुरुवातच वादाने झाली होती. एकमेकांमध्ये होत असलेल्या वादामुळे बऱ्याच स्पर्धकांनी एकमेकांना नॉमिनेट केले होते. पण त्याची चुक नंतर त्यांना माहित पडली. यावरुन स्पर्धक आपल्याला फिनालेमध्ये येण्यासाठी कोणत्याही पातळीला जातील, याचा नेम नाही. या पर्वात फिनालेतील टॉप स्पर्धकांमध्ये अपुर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने आणि राखी सावंत हे स्पर्धक आहेत.

या टास्कमुळे राखी सावंतला ग्रँड फिनालेमधून बाहेर पडावे लागले आहे. राखी सावंत या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या रुपात आली होती, तिच्या येण्याने घरात बराच नवा ट्वीस्ट अनुभवायला मिळाला होता. तिच्या येण्याने बऱ्याच स्पर्धकांनी धडकीही भरली होती, तिने आपल्या खास शैलीनेच स्पर्धकांसह अवघ्या महाराष्ट्राला हसवले. राखीच्या एक्झिटने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून कोणता स्पर्धक महाविजेता होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT