Bigg Boss Marathi 4 Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'च्या घरात डबल एलिमिनेशन, विकास सावंतच्या जाण्याने घरात नवी खेळी...

बिग बॉसचे चौथे सिझन संपायला अवघे २१ दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात २ एलिमिनेशन होणार आहेत.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: टेलिव्हिजनवर नेहमीच कार्यक्रमांमध्ये कोण अव्वल ठरणार? अशी रस्सीखेच स्पर्धा सुरु असते. पण त्यात एक कार्यक्रम नेहमीच टीआरपीमध्ये अव्वलस्थानी असतो तो म्हणजे बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरु होऊन तब्बल ७० हून अधिक दिवस पूर्ण झाले आहेत.

कार्यक्रम सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत नेहमीच या कार्यक्रमात भांडण नावाचा प्रकार सुरुच आहे. प्रत्येक आठवड्यात बिग बॉस काही तरी खतरनाक टास्क देत स्पर्धकांचे मनोरंजन करण्याचं काम बिग बॉसच्या घरात केले जाते.

बिग बॉसचे चौथे सिझन संपायला अवघे २१ दिवसच आता शिल्लक राहिले आहेत. एकूण स्पर्धक राहिलेत फक्त ८ . या आठवड्यात बिग बॉसच्या घरात २ एलिमिनेशन होणार आहेत. कालच्या चावडीवर अर्थात शनिवारी बिग बॉसच्या घरातून विकास सावंत हा स्पर्धक घराबाहेर पडला. बिग बॉसच्या ग्रॅंड फिनालेला अवघे २१ दिवसच शिल्लक राहिले आहेत.

सध्या बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अमृता देशमुख, अमृता धोंगडे, किरण माने, प्रकाश जवादे, अक्षय केळकर आणि गेल्या काही दिवसांपूर्वी वाईल्ड कार्डच्या रुपात खेळ बदलायला आलेले दोन स्पर्धक म्हणजे राखी सावंत आणि आरोह वेलणकर हे सदस्य आता उरले आहेत. या रविवारी कोणता दुसरा स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कालच्या चावडीवर विकास सावंत घराच्या बाहेर गेला असून आजच्या चावडीवर कोणता स्पर्धक घराच्या बाहेर जाणार हे पाहणे सर्वाधिक औत्सुक्याचे ठरणार आहे. विकास सावंत घराच्या बाहेर गेल्यानंतर घरातील सदस्यांच्या खेळाला आणखी एक नवे वळण मिळणार हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: हृदयरोग होण्याआधी शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच घ्या काळजी, अन्यथा जीवाला होईल धोका

Sunday Horoscope: दिवाळीचा फराळ महागात पडणार? 'या' राशींच्या व्यक्तींना आजारांचा सामना करावा लागणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Satara Doctor Case : मोगलाई व्यवस्थेनं घेतला डॉक्टरचा बळी? प्रशांत बनकरला बेड्या, गोपाळ बदने कधी होणार गजाआड? VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकला पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट

SRK Film Festival: 'देवदास' ते 'जवान', शाहरुख खानचे 'हे' चित्रपट पुन्हा होणार थिएटरमध्ये प्रदर्शित

SCROLL FOR NEXT