Bigg Boss Marathi Latest Update Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये शाब्दिक वाद रंगला

'बिग बॉस मराठी 4' च्या प्रत्येक भागासाठी सर्वच प्रेक्षक कमालीचे उत्साही असतात. आज बिग बॉसच्या घरात नवं काय घडणार? याकडे प्रत्येकाचे लक्ष असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi Seasson 4: 'बिग बॉस मराठी 4' च्या प्रत्येक भागासाठी सर्वच प्रेक्षक कमालीचे उत्साही असतात. आज बिग बॉसच्या घरात नवं काय घडणार? याकडे प्रत्येकाचे लक्ष असते. बिग बॉस मराठीच्या घरात आज विकास आणि किरण मानेची चर्चा होताना दिसत आहे,

तर दुसरीकडे अमृता देशमुख आणि किरण माने यांच्यातील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. किरण मानेला बिग बॉसच्या घरात कोणता स्पर्धक बिनकामाचा वाटतो, याचा खुलासा आजचा भागात होणार आहे.

अमृता देशमुखचे म्हणणे आहे की, किरण माने आगाऊ आहे. विकास किरणला विचारतो, दादा एवढं काय ? इतका प्रॉब्लेम काय झाला आहे ? त्यावर किरण मानेचे म्हणणे आहे, ते बरोबर आहेत तू त्यांना समजून घ्यायला चुकला आहेस.

आम्हाला त्याचा शॉक बसत नाही. तुला माहिती नाही एवढे वाईट आहेत ते. विकास आणि किरण नक्की कोणाबाबतीत बोलत आहेत ? हे आजच्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.

तर एका बाजुला, किरण माने अमृता धोंगडेशी बोलताना दिसत आहे. किरणचे म्हणणे आहे की, अगं मी हिला सहज एक वाक्य बोललो हिच्या याच्यात सूर आणि शब्द परफेक्ट असतात. त्यावर अमृता देशमुख म्हणते, इमोशन्स नसतात हे बोलले होते ते आणि असं बोलल्यावर ऐकून घ्यावं लागणारच.

किरण म्हणतो, बोलणार. नसतातच कारण... मग ही चिडली, रडली काही कळतं नाही. मग त्यांनी हा विषय RJ वर नेला की रेडिओवर भावनाच ऐकू येतात, माझं म्हणणं आहे रेडिओचा विषय काढलायं कोणी ? हिच्या नॉर्मल बोलण्यात भावना नसतात.

कळत नाही हिच्या बाजूने आहे त्याच्या बाजूने आहे? त्यावर अमृता देशमुखचे म्हणणे आहे, अहो कारण माझं नावं... आणि RJ म्हणजे बोलणं आणि बोलण्यात जर तुम्ही इमोशन्स नाही म्हणता तर कसं ना? इमोशन्स वैगरे certificate यांना द्यायची गरज नाहीये...

आगाऊ सारखं एक वाक्य बोलाल तर त्यानंतर होणार issue... किरण म्हणतो, तुझा आगाऊपणा लय बघितला आहे, बिनकामाचे इथे बसलेले लोकं सांगणार आपल्याला... आणि हा वाद सुरूच राहिला.

अजून घरात काय घडणार हे आजच्या भागातच कळेल. त्यामुळे किरण माने आणि अमृतामधील वाद आणखी किती चिघळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT