Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss फेम अभिनेत्याचा नवा आलिशान व्हिला; लोकेशन पाहून प्रेमात पडाल, पाहा PHOTO

Aroh Welankar : मराठी अभिनेता आरोह वेलणकरने नुकताच आलिशान व्हिला खरेदी केला आहे. सोशल मीडियावर नवीन व्हिलाचे फोटो शेअर करून त्याने ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक कलाकारांनी नवीन गोष्टी खरेदी केल्या आहेत. काहींनी गाडी घेतली तर काहींनी घर खरेदी केलं आहे. प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत.

आता नुकतेच बिग बॉस (Bigg Boss) फेम मराठी अभिनेत्याने व्हिला खरेदी केला आहे. हा आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आरोह वेलणकर (Aroh Welankar) आहे. यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटक यात काम केलं आहे.

आरोहने पुण्यात (Pune ) आलिशान व्हिला खरेदी केला आहे. त्याने या पोस्टला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "नवीन हँगआउट स्पॉटला हॅलो...#sagevilla" असं कॅप्शन दिलं आहे. त्याने इंस्टाग्रामवर व्हिलाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमधून व्हिलाचा मॉर्डन लूक पाहायला मिळत आहे. आरोहच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी कमेंट्स करून खूप शुभेच्छ दिल्या आहेत. आरोहच्या चाहत्यांना व्हिलाचा लूक खूपच आवडला आहे.

आरोहने 'रेगे' चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटातून आरोहने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आरोह 'बिग बॉस मराठी 2' सहभागी झाला होता. त्याचा गेम प्लान प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT