Snake in Bigg Boss OTT 3 House Saam TV
मनोरंजन बातम्या

Snake in Bigg Boss House: बिग बॉसच्या घरात लांबलचक साप; घरातील स्पर्धकांचा जीव धोक्यात, पाहा VIDEO

Bigg Boss OTT 3 News: बिग बॉसच्या घरामध्ये, भलामोठा साप आला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही व्हिडिओपाहून सर्वच लोकं घाबरले आहेत.

Chetan Bodke

'बिग बॉस ओटीटी ३' कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सर्वाधिक वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहिलेल्या या सीझनमध्ये एक मोठी गडबड झाली आहे. अरमान आणि विशाल पांडेच्या भांडणामुळे सध्या बिग बॉसचं घर चांगलंच चर्चेत आलं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये, भलामोठा साप आला होता. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही व्हिडिओपाहून सर्वच लोकं घाबरले आहेत.

'बिग बॉस ओटीटी ३'चं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर सुरू आहे. या लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यानचा व्हिडिओ एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चक्क साप दिसल्यामुळे नेटकऱ्यांकडून घरातील स्पर्धकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लाईव्ह स्ट्रिमिंगमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, टास्कनंतर लवकेश कटारियाला हात बांधून तिथे बसवलं होतं. तो जिथे बसला होता, त्याच्या पाठीमागूनच गवतावरून साप सरपटताना दिसत आहे.

आपल्या बाजूने साप गेला, याबद्दलचा लवकेशला जराही अंदाज आला नाही. त्याचं तोंड समोरच्या दिशेने असल्यामुळे त्याला साप दिसत नाही. जर चुकून तो साप लवकेशजवळ आला असता तर तो पळूनही जाऊ शकला नसता. कारण त्यावेळी लवकेश कटारिया याचे हातही बांधले होते. हा सर्व प्रकार पाहून लोक चांगलेच निर्मात्यांवर भडकल्याचे बघायला मिळतंय. कारण तो विषारी साप लवकेश कटारिया या चावला असता.

या प्रकारानंतर 'बिग बॉस ओटीटी ३' च्या निर्मात्यांनी साप घरात असल्याच्या दाव्याला नकार दिलाय. बिग बॉसच्या घरातील सापाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वचजण हैराण झाले आहेत. यासर्व प्रकारानंतर नेटकऱ्यांनी निर्मात्यांवर जोरदार टीका केली आहे. या अगोदरही बिग बॉसच्या गार्डन परिसरात माकडे आणि वेगवेगळे पक्षी आल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

SCROLL FOR NEXT