Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: बिग बॉस संपल्यानंतर निक्कीचा Me Time, आवडत्या व्यक्तीला भेटली, video ने घातला धुमाकूळ

Nikki Tamboli- Arbaz Patel: बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये निक्की अरबाज यांची चांगलीच चर्चा रंगली. शो सुरू झाल्यापासून या दोघांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळ्या ६ ऑक्टोबरला मोठ्या थाटामाटात पार पडला. बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये निक्की अरबाज यांची चांगलीच चर्चा रंगली. शो सुरू झाल्यापासून या दोघांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या शोमधील त्यांच्या केमेस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंती दिली. अशातच बिग बॉस संपल्यानंतर हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटले आहेत. याचदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बिग बॉस मराठीचा ७० दिवसांचा खेळ अखेर संपला आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीच्या घरात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अभिनेत्री निक्की आणि अरबाज या जोडीने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. कधी राडा तर कधी प्रेम अशी ही जोडी कायमच चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरातील यांच्या रोमॅन्ट्रीक केमेस्ट्रीने यांच्या नात्याला नव वळण दिलं. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यांच्या अटकळ्या लावल्या गेल्या.

बिग बॉसच्या घरातील या दोघांची वाढती जवळीक पाहून सोशल मीडियावर ही जोडी प्रेमाच्या जाळ्यात अडकणार असे अंदाज येऊ लागले. अशातच सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून अरबाजची एक्झिट झाली. दरम्यान निक्की नाराज होत ढसा ठसा रडत होती. आता बिग बॉस संपल्यानंतर ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर निक्कीने काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये अरबाज आणि निक्की यांची भेट झाली आहे. तर निक्कीची एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निक्की म्हणतेय, "फायनली मी माझा मी टाईम एन्जॉय करते सो माझ्यासोबत आहे अरबाज" असं म्हणतेय आहे.

बिग बॉसच्या घरातून अरबाज बाहेर पडल्यानंतर अरबाजने माध्यमांशी संवाद अरबाजने त्याच्या एका मुलाखतीत देखील निक्कीवरील त्याच्या नात्यावर भाष्य केलं. अरबाजला निक्कीला प्रपोज करण्याविषयी केलेल्या प्रश्नावर अरबाजने, जर मी निक्कीला प्रपोज केले तर ते माझ्यासाठी खूप स्पेशल असेल असं म्हटलं आहे. पुढे त्याने निक्कीला हे नातं पुढे न्यायचं असेल तर मी कॅमेऱ्यासमोर प्रपोज करेन असं म्हटलं आहे. अरबाजने निक्कीला तू स्ट्राँग आहेस ट्रॉफी जिंकून ये अश्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT