Bigg Boss Fame Actress Arti Singh Got Injured Instagram @artisingh5
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Fame Actress Is Injured: हॉटेलमध्ये जेवायला गेली अन् जखमी झाली.. 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसोबत घडली मोठी दुर्घटना

Arti Singh Got Injured: आरती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे.

Pooja Dange

Bigg Boss Fame Actress Arti Singh Got Injured: टीव्ही अभिनेत्री आरती सिंहसोबत एक अपघात घडला आहे. या अपघातानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला सुमारे सहा टाके पडले आहेत. अभिनेत्रीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री आरती सिंहसोबत ही घटना २३ एप्रिल रोजी घडली आहे. अभिनेत्री मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती. त्यानंतर त्याचा अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आरती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, 'हा आठवडा खूप त्रासदायक होता. सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक.. शस्त्रक्रियेतून जावे लागले. काच फुटून हातात घुसली आणि माझ्या शोचे लॉन्चिंग माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये झाले. पण, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मला एवढेच सांगेन की गुरुजींनी मला वाचवले आहे आणि माझी खूप चांगली काळजी घेतली आहे.

एका मुलाखतीत आरतीने तिच्या तब्येतीबद्दल सांगितले तेव्हा ती म्हणाली, 'माझ्या हाताची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की काचेचे सात तुकडे हातात अडकले आहेत. त्यांनी ते काचेचे तुकडे काढले आणि हाताला सहा टाके पडले. मी चार दिवसांचा ब्रेक घेतला आहे. मला दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला आणि आज पुन्हा शूटिंगला सुरुवात केली.

'ससुराल सिमर का' आणि 'उडान' सारख्या मालिकांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री काही वर्षांनंतर पुन्हा एकदा टीव्ही दिसणार आहे. 'श्रावणी' या टीव्ही शोद्वारे आरतीने बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन केले. आरती सिंह सध्या 'श्रावणी' या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT