Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: लव गिलसोबतच्या वादानंतर स्काउट ओपीने केलं टक्कल; ढसाढसा रडताना दिसला, नेमकं काय घडलं?

Bigg Boss 20: बिग बॉस 20 मध्ये लव गिलसोबत झालेल्या वादानंतर स्काउट ओपीने डोक्यावरील सर्व केस काढले. नव्या प्रोमोमध्ये स्काउट भावुक होऊन रडताना दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: 'बिग बॉस 20' च्या घरात दिवसेंदिवस वाद आणि ड्रामा वाढताना दिसत आहे. स्पर्धकांमधील मैत्री, भांडणं आणि बदलणारी समीकरणं यामुळे हा शो चर्चेत आहे. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि गेमर स्काउट ओपी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लव गिलसोबत झालेल्या वादानंतर स्काउटने चक्क स्वतःच्या डोक्यावरील सर्व केस काढून टाकले आहेत. शोच्या नव्या प्रोमोमध्ये त्याचा हा अनपेक्षित लूक पाहायला मिळाला असून तो ढसाढसा रडतानाही दिसत आहे. स्काउटच्या या कृतीमुळे घरातील इतर सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

लव गिलसोबतच्या वादामुळे स्काउट नाराज

मिळालेल्या माहितीनुसार, स्काउट आणि लव गिल यांच्यातील वाद एका कमेंटमुळे सुरू झाला. घरातील सदस्य गप्पा आणि मस्करी करत असताना स्काउटने लवच्या पायजम्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. सुरुवातीला लवने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र, घरातील इतर सदस्यांनी स्काउटच्या बोलण्यावर आक्षेप घेतल्यानंतर लव चांगलीच संतापली. तिने स्काउटला त्याच्या बोलण्याबद्दल जाब विचारला. यानंतर दोघांमधील वातावरण चांगलेच तापले. स्काउटने नंतर लवची माफी मागण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लव त्याच्यावर नाराज होती. स्काउट आणि लव यांच्यात यापूर्वी चांगली मैत्री होती. दोघेही एकमेकांना भाऊ-बहीण मानत होते. पण, मसाज वादामुळे आणि त्याच्या कमेंटमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

स्काउटने अचानक मुंडवले डोक्यावरील केस

'बिग बॉस 20' च्या नव्या प्रोमोमध्ये स्काउट ओपीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. लव त्याच्याशी बोलण्यास नकार देते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे स्काउट अस्वस्थ झालेला दिसतो. तो घरातील गार्डन परिसरातील झाडावर चढतो. यावेळी उदिती त्याला खाली उतरण्यास सांगते आणि काळजी व्यक्त करते. त्यानंतर स्काउट बाथरूममध्ये जातो आणि ट्रिमरच्या मदतीने डोक्यावरील सर्व केस काढून टाकतो. स्काउटचा हा निर्णय पाहून लवला देखील धक्का बसतो. त्यानंतर स्काउट भावुक होऊन रडताना दिसतो. लव त्याला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र, स्काउटच्या या कृतीमुळे दोघांमधील वाद आणखी चर्चेत आला आहे.

यंग डीएसएसोबतही झाला होता मोठा वाद

दरम्यान, लवसोबतच्या वादाआधी स्काउटचा यंग डीएसएसोबतही जोरदार वाद झाला होता. एका टास्कदरम्यान दोघांमधील बाचाबाची वाढली आणि स्काउटने यंगला धक्का दिला. या प्रकारानंतर घरातील इतर सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली. या घटनेची दखल घेत बिग बॉसने स्काउटला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले. तसेच त्याला यापुढे घराचा कॅप्टन होता येणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Power Nap : पॉवर नॅप किती मिनिटांची असावी? १०, २० की ३० मिनिटं; जाणून घ्या योग्य वेळ

किचनमध्ये चाकू कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्र काय सांगते?

रोहित, विराट अन् श्रेयस आले अन् भोपळाही न फोडता गेले, पहिल्याच षटकात भारताचे ३ फलंदाज बाद

Maharashtra News Live Update: सरकारी इमारती आणि मंत्र्यांच्या बंगल्यांचे होणार फायर ऑडिट; वनमंत्री गणेश नाईकांची मुख्य सचिवांकडे मागणी

ITR Deadline 2026 : 21 नोव्हेंबरपूर्वी ही 3 कामं करा! एक चूक पडेल महागात, भरावा लागू शकतो दंड

SCROLL FOR NEXT