Bigg Boss 20 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 20: स्काउटच्या मनात लव गिलबद्दल फिलिंग्स? कनिकाने थेट विचारला सवाल; घरात रंगला नवा ड्रामा

Bigg Boss 20: बिग बॉस २० मध्ये स्काउटने अचानक स्वतःचे केस कापून टक्कल केल्याने खळबळ उडाली आहे. लव्हसोबतचा वाद, कनिकाचे विधान आणि घरातील सदस्यांच्या आरोपांमुळे वातावरण तापले आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०' च्या घरात स्काउट आणि लव्ह यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोघांबद्दल घरातील सदस्यांमध्येही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अशातच स्काउटने घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे संपूर्ण घरात खळबळ उडाली आहे. स्काउटने स्वतःचे सर्व केस कापून टक्कल केले आहे. मानसिकदृष्ट्या खचल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. या घटनेनंतर घरातील सदस्यांनी एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

स्काउटचे रात्रभर विचित्र वागणं

आजच्या भागाच्या सुरुवातीला स्काउटने झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उदिती आणि अरिशफा यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण रात्रभर त्याचे वर्तन अस्वस्थ आणि विसंगत होते. अखेर तो वॉशरूमच्या परिसरात जाऊन झोपला. सकाळी तो लव्हशी बोलला. यावेळी त्याने यापूर्वी केलेली स्टेटमेंट फक्त थट्टा म्हणून होती आणि त्यामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. मात्र, लव्हने त्याला स्पष्ट शब्दांत सुनावले. तसेच यापुढे मला बहिणही बोलू नकोस, असेही तिने सांगितले.

स्काउटने स्वतःचे केस कापून केले टक्कल

या सगळ्या प्रकारानंतर स्काउट वॉशरूममध्ये गेला आणि त्याने स्वतःचे सर्व केस कापून टक्कल केले. हे पाहून घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला. लव्ह आणि माहीदेखील त्याचा हा अवतार पाहून आश्चर्यचकित झाल्या. स्काउटने हे चुकून घडल्याचा दावा केला. मात्र, त्याच्या या कृतीमुळे घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. लव्हने याबाबत चिंता व्यक्त करताना बाहेरून हा कार्यक्रम पाहणारे तिचे कुटुंबीय काय विचार करतील, अशी भीती व्यक्त केली.

घरातल्या सदस्यांची प्रतिक्रिया

या घटनेनंतर स्काउटच्या या वागण्यामागे लव्ह कारणीभूत असल्याचा संशय काही सदस्यांनी व्यक्त केला. कनिकाने दोघांनाही एकत्र बसवून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, माहीने हे सगळं आणखी किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न विचारला. तर काझीने लव्हला कदाचित या संपूर्ण परिस्थितीचा आनंद मिळत असावा, अशी कमेंट केली.

आम्रपाली आणि यंगने लव्हला धरले जबाबदार

दरम्यान, स्काउट रडू लागल्यानंतर घरातील सदस्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. अनेक सदस्यांनी या परिस्थितीसाठी लव्हला जबाबदार धरले. मात्र, लव्हने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. याचदरम्यान आम्रपाली आणि लव्ह यांच्यातही वाद झाला. आम्रपाली आणि यंग यांनी स्काउटच्या सध्याच्या अवस्थेला लव्ह जबाबदार असल्याचे सांगितले. तर, लव्हने आम्रपाली आणि यंगवर स्काउटचं ब्रेन वॉश केल्याचा आरोप केला. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण आणखी तापले असून, आगामी भागात या वादाला कोणते वळण मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ अन् पाणीकपात सुरू असताना BMC पुन्हा रस्ते धुणार; २१३ टँकर भाड्याने घेण्याचे नियोजन

Kitchen Tips : किचनमधील या पाच वस्तू किती दिवसांनी बदलल्या पाहिजेत? आरोग्याच्या दृष्टीने घ्या काळजी

Megablock Update : रविवारी प्रवाशांचे होणार मेगाहाल! लोकलच्या वेळापत्रकात बदल; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक

Diabetes & Cholesterol : डायबिटीज अन् कोलेस्ट्रॉलची चिंता सतावतेय? रोज सकाळी रिकाम्या पोटी खा 'हे' चमत्कारी पान

मोठी बातमी! सुनेत्रा पवार अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण!

SCROLL FOR NEXT