Bigg Boss 19  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : प्रणित मोरेनंतर कोण जाणार घराबाहेर? ५ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss 19 Nomination : 'बिग बॉस 19' च्या घरात या आठवड्यात कोण सदस्य नॉमिनेट झाले, जाणून घेऊयात. 'बिग बॉस 19'चा खेळ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' च्या घरातून आता प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे.

नवीन आठवड्यात ५ सदस्य नॉमिनेट झाले आहे.

घरात अमाल मलिक आणि मालतीच्या नात्यांची चर्चा पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस 19' च्या घरातून प्रणित मोरेची एक्झिट झाली आहे. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रणित मोरेला त्याच्या आजारपणामुळे बाहेर काढण्यात आले. तो लवकरच शोमध्ये पुन्हा येणार असल्याचे बोले जात आहे. प्रणित मोरेच्या एलिमिनेशननंतर आता नवीन आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. या खेळात घरातील 5 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सदस्यांना जोडीने कन्फेशन रुममध्ये बोलवले जाते. त्यांना दोन स्पर्धकांची नावे देण्यात आली, ज्यापैकी एकाला त्यांना नॉमिनेट करायचे होते. पहिल्या फेरीत, फरहाना, मालती आणि अशनूर कन्फेशन रुममध्ये आले. त्यांना मृदुल किंवा अभिषेकपैकी एकाला नॉमिनेट करावे लागले. तेव्हा त्यांनी अभिषेकला नॉमिनेट केले. दुसऱ्या फेरीत मृदुल आणि अमाल कन्फेशन रुममध्ये आले. तेव्हा त्यांनी तान्याला सुरक्षित करून फरहाना भट्टला नॉमिनेट केले.

नॉमिनेट सदस्यांची नावे

  • फरहाना भट्ट

  • गौरव खन्ना

  • नीलम गिरी

  • अभिषेक बजाज

  • अशनूर कौर

खेळाच्या तिसऱ्या फेरीत कुनिका सदानंद आणि नीलम गिरी यांना गौरव, अमाल आणि शाहबाज यांच्यापैकी एकाला नॉमिनेट करायचे होते. त्यांनी गौरवला नॉमिनेट केले. शेवटच्या चौथ्या फेरीत गौरव आणि अभिषेक यांनी मालतीला वाचवले आणि नीलमला नॉमिनेट केले. मीडिया रिपोर्टनुसार, या आठवड्यात नीलम गिरी किंवा अशनूर कौर शोमधून बाहेर पडू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: महाराष्ट्रासह पाच राज्यात मुसळधार पावासाचा इशारा; जाणून घ्या कोणत्या कोणत्या भागात कोसळणार पाऊस?

Gautami Patil-Bhau Kadam : भाऊ कदम अन् गौतमी पाटीलची जोडी सुपरहिट, दादा कोंडकेंच्या गाण्यावरील झक्कास डान्स पाहून लेकीची खास कमेंट | VIDEO

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

Accident News : अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, पिकअपची ट्रेलरला धडक; एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू

High cholesterol: ही ५ लक्षणं दिसली तर समजा रक्तवाहिन्यांमध्ये साचलंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल

SCROLL FOR NEXT