Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18' च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, टीव्ही गाजवणाऱ्या स्टार्सची स्पेशल बॉन्डिंग

Avinash - Eisha : 'बिग बॉस 18' मध्ये आता भांडणांसोबतच सदस्यांमध्ये प्रेमही वाढू लागले आहे. बिग बॉसमध्ये आता कोणता नवा ट्विस्ट येणार जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत जात आहे. या दोन आठवड्यात सदस्यांनी घरात राडा घातलेला पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात आता भांडणांसोबतच प्रेमाचे वारे देखील वाहू लागले आहेत. आता नवीन प्रेमकहाणी सुरू होत आहे.

बिग बॉसच्या घरात करण वीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यात जोरदार भांडण होते. तेव्हा घरातील सर्व सदस्य करण वीर मेहराची बाजू घेतात. फक्त ईशा सिंग, ॲलिस कौशल आणि विवियन देसना हे तिघे अविनाशची बाजू घेताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत ईशा (Eisha Singh) सिंग,ॲलिस आणि अविनाशमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळत आहे. मात्र ईशासोबतच अविनाशचे नाते काही खास दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात अरफिन खान आणि रजत दलाल यांच्यात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे की, या दोघीही नेहमी अविनाश (Avinash Mishra) सोबतच बोलतात. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला एकाला अविनाश आवडत असणार. तेव्हा अरफिन हा ईशाच नाव घेतो. घरात ईशा आणि अविनाशचे खास बाँडिंग पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात चाहत अविनाशशी बोलत असताना, चाहत अविनाशसोबत बोलत असताना, "ईशा आणि ॲलिस तिला म्हणतात की, अविनाश इतर मुलींशी चांगले बोलतो. परंतु नेहमीच नाही" तसेच जेव्हा ईशा चीज आणि चिकन परत मागते तेव्हा अविनाशला ईशावर राग येतो. अविनाश आपल्यावर रागवलेला पाहून ईशा खूप भावुक होते.

'बिग बॉस 18' मध्ये आता कोणते नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आणि या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच अविनाश आणि ईशाची मैत्री पुढे कोणते वळण घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT