Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

श्रुतिकानं चक्क Bigg Bossला तमिळ बोलायला लावलं, म्हणाली बँकॉक..., पाहा धमाल VIDEO

Bigg boss 18 : बिग बॉसने श्रुतिकासोबत एक मजेशीर संवाद साधला आहे. कन्फेशन रूमध्ये बोलवून त्यांच्यात नेमकं काय बोलणे झाले जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र 'बिग बॉस 18' ची (Bigg boss 18 ) चर्चा पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरात नवीन राडा होत आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,श्रुतिकाला (Shrutika) कन्फेशन रूमध्ये बोलवण्यात येते. बिग बॉसने तिला एका खास गोष्टीसाठी कन्फेशन रूमध्ये बोलावले असते. बिग बॉस विचारतात की, तुमच्या बँकॉकमध्ये असणाऱ्या नवऱ्याला काय निरोप द्यायचा आहे का? यावर श्रुतिका खूप मजेशीर उत्तर देते. ती बिग बॉसलाच तमिळमध्ये बोलण्यास सांगते.

श्रुतिका कन्फेशन रूमध्ये असताना तिच्या नवऱ्याने कॉल करत तिला थायलंडच्या ट्रीपमध्ये कंपनी द्यायला सांगितले. असे बिग बॉस म्हणतात. यावर श्रुतिका म्हणाली की, माझी बारा वर्षांची ट्रेनिंग आहे. दोन आठवड्यात जाणार नाही. मी परत आल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही असे ती बिग बॉसला तमिळमध्ये आपल्या नवऱ्याला निरोप द्यायला सांगते.

बिग बॉस स्वतः श्रुतिकाच्या मागून तमिळमध्ये बोलताना दिसत आहे. यापुढे श्रुतिका बिग बॉसला म्हणते की, बँकॉकमध्ये सँडविच मसाज बॉडी मसाज सगळं मिळते. खूप स्वस्त मिळतात. तिथे एकटे जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या नवऱ्याला ती खास निरोप द्यायला सांगते.

बिग बॉसच्या घरात छोट्या छोट्या कारणांमुळे भांडण होताना पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस 18' च्या तिसऱ्या आठवड्यात विवियन डीसेना, अविनाश मिश्रा , मुस्कान बामणे, रजत दलाल आणि नायरा बॅनर्जी हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांपैकी कोण बिग बॉसचे घर सोडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT