Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : तुम्ही कोर्टातही असंच बोलता का? तृप्ती डिमरीने थेट सदावर्तेंना केला सवाल

Gunaratna Sadavarte : 'बिग बॉस 18' मध्ये 'वीकेंड का वार'ला अनेक सेलिब्रिटी आले होते. त्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी गुणरत्न सदावर्ते यांना एक प्रश्न विचारते ज्यामुळे सर्वजण हसू लागतात.

Shreya Maskar

सलमान खानच्या बिग बॉसचे मोठे चाहते पाहायला मिळतात. यंदा बिग बॉस 18चं (Bigg Boss 18) होस्टिंग सलमान खान (salman khan) करत आहे. नुकताच घरात 'वीकेंड का वार' पार पडला. पहिल्याचं वीकेंडच्या वारमध्ये अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले आहेत. भारती सिंगने आपल्या कॉमेडीची जादू बिग बॉसच्या घरात करताना पाहायला मिळाली आहे.

'बिग बॉस 18' सध्या सर्वत्र गाजत आहे. नुकताच घरात पहिला 'विकेंड का वार' पार पडला आहे. यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यात 'बिग बॉस'च्या शोवर बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि अभिनेता राजकुमार राव देखील आपली हजेरी लावतात. तृप्ती डिमरी नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असेत. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तृप्ती डिमरीला खरी प्रसिद्धी ॲनिमल या चित्रपटामुळे मिळाली.

तेव्हा बिग बॉसच्या घरात तृप्ती आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात मजेशीर संवाद होतो. ज्यामुळे सर्वजण हसू लागतात. तृप्ती डिमरी थेट गुणरत्न सदावर्ते यांना प्रश्न करते की, "तुम्ही कोर्टातही असेच बोलता का?" यावर सदावर्ते यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं आहे. ते म्हणतात की,"अगली तारीख में हमारा भी किरदार देखिये" गुणरत्न सदावर्ते हे असे बोलताच सर्वजण हसू लागतात.

बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वक्तव्याने संपूर्ण घर गाजवत आहेत. त्यांनी आपल्या पाळीव गाढवासोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. आता पुढे गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात काय धुमाकूळ घालणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT