Munawar Faruqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Winner: 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर मुनव्वर फारुकीने कोरलं नाव, ट्रॉफीसोबत मिळाली इतकी रक्कम?

Munawar Faruqui: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17'चा (Bigg Boss 17) धमाकेदार ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बिग बॉस 17 ला विनर मिळाला असून या शोची ट्रॉफी मुनव्वर फारुकीने आपल्या नावावर केली आहे.

Priya More

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui:

Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17'चा (Bigg Boss 17) धमाकेदार ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. होस्ट सलमान खानने बिग बॉस 17 च्या विनरची घोषणा केली. बिग बॉस 17 ला विनर मिळाला असून या शोची ट्रॉफी मुनव्वर फारुकीने आपल्या नावावर केली आहे. अभिषेक कुमार या शोचा उपविजेता ठरला आहे. बिग बॉस 17 ला अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण महशेट्टी हे पाच फायनलिस्ट मिळाले होते.

बिग बॉस 17 च्या प्रेक्षकांनी या पाचही सदस्यांना खूप चांगली पसंती दिली. पण बिग बॉस विनरच्या शर्यतीमधून सुरूवातीला अरुण महशेट्टी बाहेर पडला. अरुण पाठोपाठ अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा या देखील या शर्यतीतून बाहेर पडल्या. मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी अटीतटीची लढत झाली. अखेर मुनव्वर फारुकीने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली.

बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले खूपच रंगतदार झाला. यावेळी बिग बॉसच्या घरातील पाचही फानलिस्टने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिले. बिग बॉस 17 च्या पाचही फानलिस्टच्या चाहत्यांना त्यांना आवडत असलेल्या स्पर्धकाने या शोची ट्रॉफी जिंकावी असे वाटत होते.

पण ऑडियन्सने दिलेल्या ओटिंगनुसार विनरच्या शर्यतीतून सर्वात आधी अरुण महशेट्टी बाहेर पडला. तो या शोचा फर्स्ट फायनलिस्ट ठरला आहे. अरुण महशेट्टी पाठोपाठ अंकिता लोखंडेला ऑडियन्सकडून कमी ओटिंग मिळाले त्यामुळे ती देखील विनरच्या शर्यतीतून बाहेर पडली. अंकिता ही बिग बॉस 17 ची सेकंड फायनलिस्ट ठरली.

अंकिता लोखंडेनंतर बिग बॉस 17 ला टॉप ३ सदस्य म्हणजे मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा मिळाले. या तिघांपैकी मन्नारा चोप्राला देखील कमी ओटिंग मिळाल्यामुळे तिला देखील विनरच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. मन्नारा चोप्रा ही बिग बॉस 17 ची तिसरी फायनलिस्ट ठरली.

त्यानंतर विनरची ट्रॉफी जिंकण्यासाठी मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार हे आमने-सामने आले. शेवटी या शोची टॉफी मुनव्वर फारुकीने जिंकली. या शोच्या ट्रॉफीसोबत मुनव्वर फारुकीला 50 लाख रुपयांचा चेक बक्षीस स्वरुपात मिळाला. त्याचसोबत कार देखील गिफ्ट करण्यात आली आहे. मुनव्वर फारुकीच्या वाढदिवशीच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला असून या शोचा विनर होत त्याने वाढदिवशी स्वत:ला मोठं गिफ्ट दिलं आहे. चाहते सध्या मुनव्वर फारुकीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट

NEET UG 2026: NEET ची पुन्हा परीक्षा कधी होणार? फी किती? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

How To Boost Memory Power: घोड्याच्या स्पीडने काम करेल तुमचा मेंदू, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज करा या 4 गोष्टी

Bollywood Actress : १६ वर्ष बॉलिवूडमध्ये काम केले; अभिनेत्रीने आता भारत सोडला, नेमकं कारण काय?

Badlapur : बदलापुरात उघड्यावर मासे विक्रीवर बंदी, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT